गुहागर, ता. 11 : मच्छीमार बोटीवरील तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील खारवी समाज समिती तर्फे दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता गुहागर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. March at Guhagar Tehsil Office
दि. 20 ऑक्टोबर रोजी साखरी आगर येथील मच्छीमार रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणाऱ्या जयप्रकाश विश्वकर्मा याने सुरीने तांडेल रविंद्र नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या केली. तसेच बोट पेटवून दिली होती. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अतिशय घृणास्पद, मानवी जातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून अशा पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी. तसेच संबधित घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. या घटनेचा निःपक्षपातपणे पोलीस तपास व्हावा अशा मागणीच्या आशयाचे निवेदन शासन दरबारी देण्यासाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील खारवी समाज समिती गुहागरचे अध्यक्ष श्री. महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मूख मोर्चा काढण्यात येणार आहे. March at Guhagar Tehsil Office