उद्या दि. 15 रोजी गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मासू गावातील नळपाणी योजना जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या मार्फत सन 2021-22 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. परंतू सदर दुरुस्तीचे काम ठेकेदाराने योग्य रीतीने पुर्ण न केल्याने अद्याप कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे सात वाड्यातील ग्रामस्थांना पाण्यापासून वणवण भटकावे लागत आहे. यासाठी मनोज जाधव व आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने उद्या दि. 15 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत लेखी निवेदन तहसीलदार गुहागर यांना दिले आहे. Manoj Jadhav’s hunger strike for water
मासू गावातील नळपाणी योजनेच्या दुरुस्तीचे काम चालू असताना ग्रामपंचायतीने सोयीस्करपणे दुर्लक्षच केलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचे अक्षरशः हाल होत असून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे नाईलास्तव हा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. तरी सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असा गंभीर इशारा मासू बौद्धवाडी येथील मनोज गौतम जाधव व आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने लेखी निवेदन तहसीलदार गुहागर यांना दिले आहे. Manoj Jadhav’s hunger strike for water


या निवेदनात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करावी व अर्धवट झालेले काम तातडीने पूर्ण करावे आणि पाण्याचा प्रश्न सोडवावा. शासनाने १५ लाख रुपये खर्च करून ग्रामस्थांना महिनाभर पण पाणी मिळत नसेल तर अधिकारी अशा प्रकारे काम करतात याकडे सुध्दा शासनाने लक्ष घालावे. मासू नळपाणी योजना जलजिवन योजनेतून मंजूर झाली असून सहकारी मजूर संस्था खेड या संस्थेने काम हाती घेतले आहे. सदर कामाची वर्क ऑर्डर घेतली असून 15 महिने उलटले तरी सुद्धा अद्याप काम झालेले नाही. जर अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला पाठिशी घालत असतील, शासनाचा निधी परत जाणार असेल, तर त्याला जबाबदार कोण? अशा अनेक गंभीर प्रश्नांवर न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. Manoj Jadhav’s hunger strike for water
याबाबत तहसिलदार गुहागर यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनाच्या प्रती १) मान.शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, २) मान.गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर, ३) मान.जिल्हाधिकारी रत्नागिरी, ४) मान.जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, ५)मान. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी, ६) मान.उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा योजना पंचायत समिती गुहागर, ७)मान.पोलिस निरिक्षक पोलिस ठाणे गुहागर यांना देण्यात आलेल्या आहेत. Manoj Jadhav’s hunger strike for water