गुहागरच्या तरुणासह १५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
गुहागर, ता. 22 : गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू रत्नागिरीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी सातार्डा चेकपोस्टवर सापळा रचून रंगेहात पकडले. या धडक कारवाईत दारूसह वाहन असा तब्बल १५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Major operation at Satarda checkpost
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र प्रवीण मयेकर (वय ३०, रा. अडूर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर (MH-08/BK-8181) मधून गोव्याहून मोठ्या प्रमाणात दारू घेऊन रत्नागिरीकडे जात होता. सातार्डा चेकपोस्टवर पोलिसांनी संशयाच्या आधारे वाहन थांबवून कसून तपासणी केली असता वाहनात गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू आढळून आली. तपासणीत ४० हजार ७०० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले १५ लाख रुपये किमतीचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन देखील ताब्यात घेण्यात आले. अशाप्रकारे एकूण १५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. Major operation at Satarda checkpost

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर व पोलीस कॉन्स्टेबल बर्गे यांच्या पथकाने केली. सावंतवाडी पोलिसांच्या या कारवाईत गुहागरची व्यक्ती सापडल्याने खळबळ उडाली आहे. Major operation at Satarda checkpost