गुहागर, ता. 18 : महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना निवडून आणण्यासाठी महायुती मधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर खचली आहे. आज सायंकाळी गुहागर शिवाजी चौक येथून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या रॅलीच्या माध्यमातून महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. Mahayuti’s show of strength in Guhagar city


महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल, माजी आमदार डॉ. विनय नातू, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, शिवसेना शहराध्यक्ष निलेश मोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, शहराध्यक्ष नरेश पवार यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांची रॅली शिवाजी चौक येथून बाजारपेठ करून गजानन वेल्हाळ यांच्या दुकानासमोर छोटीखानी सभा घेण्यात आली. Mahayuti’s show of strength in Guhagar city