खासदार शिंदे, संपूर्ण परिवाराचा विचार मुख्यमंत्री करतात
गुहागर, ता. 7 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यासाठी कोर्टात जाणारे, चेष्टा करणारे, पैसे कसे देणार असे प्रश्र्न विचारणाऱ्या विरोधकांनाही आता बहीण आठवली आहे. आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी 3 हजार रुपये देण्याचे आश्र्वासन दिले आहे. परंतू हिमाचल, तेलगंणा आणि कर्नाटक राज्यात यांनी सुरु केलेल्या योजनांचे हप्ते एका महिन्यानंतर थांबले. तेव्हा कितीही आश्र्वासने दिली तरी हे पूर्ण करु शकत नाहीत. असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. ते गुहागरमध्ये महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. Mahayuti workers meeting in Guhagar
गुहागरमधील भंडारी भवनमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा प्रवास एक रिक्शाचालक ते मुख्यमंत्री असा आहे. 20 ते 21 तास काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्र्नांची जाण आहे. म्हणूनच त्यांनी सर्वसामान्य परिवाराचा विचार केला. गृहीणीसाठी लाडकी बहीण, वृध्दांसाठी वयोश्री, मुलीच्या शिक्षणांसाठी निधी, कुटुंबातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून मुख्यमंत्री रोजगार योजना, अशा परिवारातील प्रत्येक घटकाचा विचार महायुतीच्या सरकारने केला. गेल्या अडीच वर्षात राज्यात उद्योगांमध्ये वाढ झाली. करार केलेल्या सर्व कंपन्यांपैकी 70 टक्के प्रकल्पांची कामे सुरु झाली आहेत. सर्व सामान्यांचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गुहागरमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील, जनतेच्या प्रश्र्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. आता या सामान्य कार्यकर्त्यांला आमदार बनविण्यासाठी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढील 13 दिवस दररोज 5 तास मेहनत घ्यावी. असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. Mahayuti workers meeting in Guhagar
या मेळाव्याला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, धैर्यशील माने, खासदार माजी आमदार सदानंद चव्हाण, गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख बाबू कनगुटकर, भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, चिपळूण तालुकाध्यक्ष अजित थरवळ, राष्ट्रवादीचे गुहागर तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Mahayuti workers meeting in Guhagar