आमदार जाधवांची रणनिती यशस्वी
गुहागर, ता. 10 : रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. मात्र गुहागर विधानसभा मतदारसंघात अनंत गीतेंचे प्राबल्य पहायला मिळाले. आमदार जाधव यांनी मतदारसंघात प्रचाराचे केलेले सुक्ष्म नियोजन, समाजाकडुन मिळालेला प्रतिसाद, अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते, संविधानचा बदलणार हे मुद्दे यशस्वी झाले. दुसरीकडे महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी कमालीच्या एकजुटीने काम केले. तरीही मताधिक्याच्या परीक्षेत ते अयशस्वीच झाले. भाजपने प्रतिष्ठा पणाला लावून केलेल्या विकास कामांचा उपयोग मते पारड्यात पडण्यासाठी झाला नाही. आणि खेडच्या खाडीपट्ट्यातील रामदास कदमांचा प्रभाव ओसरल्याचे दिसून आले. Mahayuti in Trouble
आमदार जाधव यांच्या खांद्यावर राज्यातील प्रचाराची जबाबदारी असल्याने त्यांनी अनंत गीतेंसाठी गुहागर विधानसभा क्षेत्रात केवळ तीन ते चार सभा केल्या. मात्र तत्पुर्वी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषद निहाय बैठका घेवून गावनिहाय मतांचा विचार करुन नियोजन केले. अनंत गीतेंनी समाज बांधवांना साथ देण्याची विनंती केली होती. संपूर्ण देशातील अल्पसंख्यांक समाज नियोजनबद्ध रितीने काँग्रेसच्या मागे उभा रहात होता. त्याचा फायदा करुन घेण्याची आमदार जाधव यांनी स्वतंत्र्य समितीद्वारे मतदारसंघातील अल्पसंख्यांक समाजाशी सातत्याने संपर्क साधला. संविधान बदलणार हा प्रचार प्रभावी ठरत असल्याने बौध्द समाजातील प्रचारासाठी स्वंतंत्र्य यंत्रणा कार्यरत केली. साथीला पक्ष फोडल्याचा भावनिक प्रचार करुन सहानुभुतीची मते मिळविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच अनंत गीतेंनी या मतदारसंघात 27 हजार 596 चे मताधिक्य मिळवले. Mahayuti in Trouble
या मताधिक्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. मताधिक्यानंतरही आपण कुठे कमी पडलो याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यापेक्षा अधिक मते मिळवून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार हा संदेश देण्यात आमदार जाधव यशस्वी झाले आहे. शिवाय राज्यातील प्रचाराची जबाबदारी असल्याने येथील प्रचारामध्ये मुख्य भुमिका माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांना बजावायला सांगुन त्यांच्या आमदारकीची वाट सुलभ होण्यास आमदार जाधव यांनी मदत केली आहे. Mahayuti in Trouble


खासदार म्हणून सुनील तटकरे निवडून आले असले तरी गीतेंचे मताधिक्य महायुतीसाठी चिंता वाढवणारे ठरले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचार केला. तीन पक्षांचे कार्यकर्ते एकत्र प्रवास करत होते. एखादा अडचणीचा विषय आला तर समन्वयाने सोडवला जात होता. मोदींसाठी मत द्या हा मुद्दा मतदारांपर्यंत पोचविण्यात यशस्वी झाले होते. त्यामुळे किमान 5 हजारापर्यंतचे किमान मताधिक्य मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती. त्या मताधिक्याच्या जोरावर विधानसभा जिंकण्याचे स्वप्न महायुती पहात होती. प्रत्यक्षात महायुतीसाठी गीतेंना मिळालेले 27 हजारांचे मताधिक्य कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग करणारे ठरले. Mahayuti in Trouble
निवडणुकीतील आकडेवारी पाहिली तर चिपळूण तालुक्यातील 92 बुथमध्ये महायुतीला तुलनेत चांगली मते मिळाली. आमदार शेखर निकम यांचा पालवण, वहाळ पट्ट्यावर असलेल्या प्रभावाचे दर्शन झाले. गुहागर तालुक्यातील 140 बुथमध्ये आजही भाजप पाय रोवण्यासाठी संघर्ष करतो आहे. तर खेडच्या 90 बुथमधील शिवसेना नेते रामदास कदम यांचा प्रभाव ओसरत चालला आहे का असा प्रश्र्न पडण्यासारखी स्थिती आहे. अर्थात या 90 बुथमध्ये अल्पसंख्यांक मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. Mahayuti in Trouble
गुहागर विधानसभा मतदारसंघात संपूर्ण गुहागर तालुक्यातील 140 मतदान केंद्र, चिपळूण तालुक्यातील 92 मतदान केंद्र आणि खेड तालुक्यातील 90 मतदान केंद्र येतात. विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 35 हजार 877 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी अनंत गीते यांना 74 हजार 626 मते मिळाली तर सुनील तटकरे यांना 47030 मते मिळाली. अनंत गीतेंनी या मतदारसंघात 27 हजार 596 चे मताधिक्य मिळवले. Mahayuti in Trouble