साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट ची नुकसान भरपाईची मागणी
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील वेळणेश्वर वाडजई येथील साथ साथ चारिटेबल ट्रस्टने रस्त्याच्या बाजूला वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून लावलेली सुमारे दीडशे झाड महावितरणचे अंडरग्राउंड केबल टाकताना ठेकेदाराने बेपरवाहीने मालकाची कोणतीही परवानगी न घेता जेसीपी ने चर खणत असताना उपटून फेकून दिली. Mahavitaran’s contractor uprooted trees
याबाबत साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी शरद जोशी यांनी सांगितले की, आमच्या ट्रस्टतर्फे पर्यावरण रक्षणासाठी व पादचाऱ्यांना सावली मिळावी म्हणून आम्ही वेळणेश्वर मध्ये जुलै २०२३ मधे शंभर वडाची झाडे ब्लास्टिंग करून खड्डे खणून रस्त्याच्या कडेला “वनसंवर्धन” दिन याचे औचित्य साधून लावली होती. त्यातली काही झाडे पावसाने मूळ कुजल्या मुळे मेल्यानंतर जुलै २०२४ ला आम्ही दीडशे रुपयाला एक अशी साठ झाडे, सात फूट उंचीची, देवरुख येथील जंगल नर्सरीतुन आणून नवीन लावली. या प्रकल्पासाठी तीन लाख रुपये खर्च केले. दुर्दैवाने केबल टाकायच्या कामासाठी जेसीबीने चर खणत असताना, पर्यावरणासाठी अतिशय मौल्यवान असलेली झाडे निर्दयीपणे उपटून फेकून दिली. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही लागवड नाश पावली. Mahavitaran’s contractor uprooted trees
आम्ही डोनेशन मिळवून स्वखर्चाने हा उपक्रम राबवून ती झाडे लावली त्याला पाणी घालून ती जगवली आणि त्या झाडांची जेसी बी ने वाट लावली. याला सर्वस्वी एम.एस.ई.बी. डिपार्टमेंट जबाबदार आहे. आपण कॉन्ट्रॅक्टरला सांगून या सर्वांची भरपाई करून सव्वाशे ते दीडशे झाड आम्हाला वडाची लावून द्यावीत ही आमची विनंती केली आहे. या बाबत ग्रामपंचायत, पर्यावरण मंत्रालय येथे पत्र व्यवहार करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. Mahavitaran’s contractor uprooted trees