गुहागर, ता. 07 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर येथे प्रतिवर्षीप्रमाणे उद्या शुक्रवार दि. 08 मार्च 2024 रोजी श्रींचा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Mahashivratri at Vyadeshwar Temple
महाशिवरात्री उत्सवनिमित्त शुक्रवार दि. 08 मार्च 2024 रोजी सकाळी ७ ते 9.30 वा. श्रींची षोडशोपचारे पुजा व लघुरुद्र, दु. 12 वा. महाआरती, दु. 2 ते 7 वा. सुस्वर भजने, रात्रौ 8.30 ते 9.30 वा. श्री देव व्याडेश्वर दिंडी सेवा मंडळ चिखली यांचे वारकरी कीर्तन, रात्रौ 10 वा. ढोल पथक, टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वा. रुद्र याग हे कार्यक्रा करण्यात येणार आहेत. Mahashivratri at Vyadeshwar Temple


शनिवार 09/03/2024 ते सोमवार 11/03/2024 असे तीन दिवस संध्या 6 ते 10 या वेळेत श्री व्याडेश्वर महाशिवरात्री महोत्सवानिमित्त रेकॉर्ड डान्स, पालखी नृत्य, जाखडी नृत्य, दांडीया, आर्केस्ट्रा, मंगळागौर, जादुचे प्रयोग, नमन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वांसाठी विविध करमणूकीचे कार्यक्रम, विविध शाकाहारी पदार्थाचे स्टॉल, विविध वस्तूचे स्टॉल्स पोलिस परेड मैदान, गुहागर येथे लावण्यात येणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंती श्री देव व्याडेश्वर फंडाच्या विश्वस्थ व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. Mahashivratri at Vyadeshwar Temple