गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे, वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा शेतकरी सेनेचे अध्यक्ष उमेश लटके यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या नेमणुका करण्यात आल्या. Maharashtra Navnirman Shetkari Sena recruitment announced


यावेळी जिल्हा सचिव संतोष नलावडे, चिपळूण तालुका सचिव संदेश साळवी, तसेच चिपळूण तालुका शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश घाग यांच्या उपस्थितीमध्ये नेमणुका करण्यात आल्या. मनीष तळेकर जिल्हा सचिव, (संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर), नितेश सावंत जिल्हा सचिव (चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड), जगदीश साळवी उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी, लांजा, राजापूर), महेश मयेकर तालुकाध्यक्ष रत्नागिरी, सतीश खामकर तालुका सचिव रत्नागिरी, प्रदीप कनेरी तालुकाध्यक्ष राजापूर, मंदार दांडेकर तालुकाध्यक्ष दापोली, सुरेश सावंत तालुका सचिव चिपळूण, गणेश राजेंद्र खेतले प्रसार माध्यम तालुकाध्यक्ष चिपळूण, महेंद्र धाडवे उपतालुकाध्यक्ष चिपळूण, (सावर्डे कोकरे विभाग) निखील महाडिक (उमरोली, शिरळ विभाग) केतन सावंत शाखाध्यक्ष निर्व्हाळ यावेळी वैभव खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी कशाप्रकारे दूर कराव्यात, लवकरच जिल्ह्यामध्ये कृषी मेळावा घ्यावा, यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या व नवयुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. Maharashtra Navnirman Shetkari Sena recruitment announced