मुंबई, ता. 30 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकांविषयी भाष्य केले. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी आयोगाने गेल्या दोन दिवसांपासून ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. Maharashtra Assembly Elections
या चर्चेत सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, असे राजकीय पक्षांनी म्हटले. फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करु, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले. Maharashtra Assembly Elections
26 नोव्हेंबर रोजी विधान सभेचा कार्यकाळ संपणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 9. 59 कोटी मतदार असून पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 19.48 लाख आहे. महाराष्ट्रत एकूण 1,00,186 पोलिंग बूथ असून यात अर्बन बूथची संख्या 42,585 तर रूरल पोलिंग बूथची संख्या 57,601 इतकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच महाराष्ट्र दौरा केला. यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास 14 राजकीय पक्षांसोबत बैठक घेतली. यात दिवाळी आणि इतर उत्सवाला लक्षात घेता निवडणूक जाहीर करण्यात यावी अशी नेत्यांची भूमिका होती. तसेच मतदारांसाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पक्षांकडून करण्यात आली. Maharashtra Assembly Elections
राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. Maharashtra Assembly Elections
शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. 350 असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान क्षेत्र असेलल्या कुलाबा, कल्याण, कुर्ला, मुंबादेवी इथ मतदान कमी झालं आहे. गडचिरोली येथे 73 टक्के मतदान झालं, मग कुलाबा कल्याण येथे मतदानाचा टक्का वाढायला हवा. इथल्या मतदारांनी विचार करायला हवा,असेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. Maharashtra Assembly Elections
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अँप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणुक काळात रात्री 6 ते सकाळीं 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवर देखील लक्ष ठेवलं जाईल. Maharashtra Assembly Elections