गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. एम. ए.थरकार सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व सर्व उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. Mahaparinirvana Day at Talvali High School
इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. समीरा जोशी हिने प्रास्ताविक व स्वागत केले. कु. स्वरा साळवी, कु. श्रावणी पवार, को.माही मयेकर या विद्यार्थिनीनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर अशी भाषणे केली. त्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावर प्रकाशझोत टाकला. मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर जसे वाचन प्रेमी होते, शिक्षण प्रेमी होते, ग्रंथ वेडे होते. त्या जोरावरच त्यांनी उच्च ज्ञान आत्मसात केले. त्यामुळेच जगातील मोजक्या ज्ञानी लोकांमध्ये त्यांची गणना होते. म्हणून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या भेटीचा एक प्रसंग तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला. Mahaparinirvana Day at Talvali High School
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीनाथ कुळे व इतर सहकारी शिक्षक वृंद यांनी केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेया गिजे, समीरा जोशी, माही मयेकर व पायल धामणस्कर या विद्यार्थिनीनी प्रास्ताविक, स्वागत, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन या जबाबदा-या यशस्वीरीत्या पार पाडल्या. या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके, श्री.केळस्कर, श्री. गवळी, प्रा.जड्याळ, सौ. नाईक, श्री पुनस्कर, प्रा.सावंत, लिपिक श्री. कदम, श्री. अक्षय चव्हाण, श्री.प्रणय आरोलकर आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. Mahaparinirvana Day at Talvali High School