सौरभ पवार यांच्या हस्त कलेतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे दत्ताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे साजरा करण्यात आला. Mahaparinirvana day at Aabloli
या निमित्त ५ डिसेंबर २०२४ रोजी रात्रौ १२ वाजता विश्वरत्न, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला आनंदवन बुद्ध विहार आबलोली या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम कदम,सेक्रेटरी अविनाश कदम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून विश्वभूषण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर बुद्ध पुजा पाठाचा , बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे /अमर रहे/ जबतक सुरज चॉंद रहेगा / बाबा आपका नाम रहेगा/ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर बुद्ध विहाराच्या पटांगणातील रंगमंचावर विश्वभूषण,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला दत्ताराम कदम, अविनाश कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर सौरभ पवार यांनी रांगोळी मधून साकारलेल्या विश्वभूषण, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित महिला-पुरुष आणि बालकांनी अगरबत्ती, मेणबत्ती प्रज्वलित करून आणि फुले अर्पण करून दर्शन घेतले. Mahaparinirvana day at Aabloli
दुसऱ्या दिवशी दिनांक ६ डिसेंबर ३०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता आनंदवन बुद्ध विहार येथे बुद्ध पुजा पाठाचा, बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर विश्वभूषण, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन सभेला कु,समृद्धी पवार, कु. निशांत कदम, अनंत पवार, अविनाश कदम, दत्ताराम कदम यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी आनंदवन नगरातील धम्म बंधू – भगीनी आणि बालके बहुसंख्येने उपस्थित होती. Mahaparinirvana day at Aabloli