संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : विलेपार्ले – अंधेरी पूर्व विभागातील बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. २४ महिला मंडळ यांच्या विद्यमाने महामातांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर जयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष पारमि प्रोडक्शन मुंबई दिपाली पवार प्रस्तुत टीव्ही कलाकार, सूत्रसंचालक रविंद्र पवार यांच्या माध्यमातून ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना प्रबोधनात्मक प्रश्न विचारून विविध बक्षिसे व विजेत्यांना पैठणी देण्यात आली. Mahamata Jayanti at Andheri
कार्यक्रमाची सुरुवात गटाचे बौद्धाचार्य विश्वास सावंत व चंद्रकांत जाधव यांनी बुद्ध वंदनेने केली. सदर कार्यक्रम गटाच्या महिला अध्यक्षा सुनीता सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राजेंद्र भालेराव (सीआयएसओ ) व बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. २४ चे अध्यक्ष सदाशिव जाधव, सचिव स्वप्नील कळंबे, कोषाध्यक्ष धम्मेश जाधव, हिशोब तपासणीस सचिन शिंदे, माजी गट प्रतिनिधी सिद्धेश्वर कासारे, माजी अध्यक्ष रामदास पवार, बी.जी. पवार तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत धोत्रे, के. डी. मोरे, वसंत ससाणे, सुधाकर जाधव तसेच गटांतर्गत येणाऱ्या विविध शाखांचे महिला पुरुष पदाधिकारी व सभासद बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. Mahamata Jayanti at Andheri
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती उत्सव मंडळाच्या महिला सचिव शिल्पा तांबे यांनी केले. महिला उपाध्यक्षा मनिषा पवार, महिला उपाध्यक्षा भरती धोत्रे, महिला सचिव सरोज जाधव, महिला सह सचिव अनघा जाधव, महिला कोषाध्यक्षा नम्रता पवार यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला. Mahamata Jayanti at Andheri