संत तुकाराम महाराज सभागृह, गुहागर बाजार शृंगारतळी येथे दि. 12 रोजी आयोजन
गुहागर, ता. 10 : कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने महामानवांच्या व राष्ट्रमातांच्या जयंतीचे आयोजन संत तुकाराम महाराज सभागृह, गुहागर बाजार शृंगारतळी येथे दि. 12 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. Mahamanav and Rashtramata Jayanti by Teachers Association
यावेळी प्रमुख वक्ते पाली विभाग प्रमुख सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई, प्राध्यापक विजय मोहिते उपस्थित राहणार आहेत. महामानवांचे बहुजन समाजाच्या शिक्षणासाठीचे योगदान व नवीन शैक्षणिक धोरण याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा सचिव संतोष मोहिते, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पडवळकर, जिल्हा प्रतिनिधी व माजी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, माध्यमिक कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष विश्वास खर्डे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, संचालक चंद्रकांत झगडे, गुहागर तालुका शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक कैलास शार्दुल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र कुळये, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, उर्दू संघटनेचे अध्यक्ष साजिद मुकादम, अखिल प्राथमिक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड, कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, कोषाध्यक्ष सुहास जाधव, सचिव वैभवकुमार पवार यांनी केले आहे. Mahamanav and Rashtramata Jayanti by Teachers Association