रत्नागिरी, ता.13 : शहराजवळील काजरघाटी-पोमेंडी खुर्द येथील महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णौद्धाराचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी दि. १५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देवस्थानतर्फे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Mahalakshmi Temple Restoration Ceremony


वर्धापन दिनानिमित्त सकाळी ७ वा. श्रींची पूजा, ८ ते दु. १२ वा. सप्तशती पाठ (हवन) व श्री सत्यनारायण पूजा, दुपारी १ वा. श्रींची आरती व नैवेद्य, दुपारी ३ ते सायंकाळी ७ स्थानिक भजने, सायंकाळी ७ ते ७.३० धुपारती, सायंकाळी ७.३० ते रात्री १० पर्यंत महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता गुणगौरव समारंभ होणार आहे. यामध्ये व्यसनमुक्त झालेल्या ग्रामस्थांचा सत्कार प. पू. सदगुरू स्वामी बाळ सत्याधारी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता काजरघाटी येथील श्री महालक्ष्मी हौशी नाट्य मंडळाचे बहुरंगी नमन होणार आहे. यावेळी देवरूख येथील युवा शाहीर विनय टक्के उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान, उत्सव समितीने केले आहे. Mahalakshmi Temple Restoration Ceremony