• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महासंस्कृती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

by Manoj Bavdhankar
February 4, 2024
in Ratnagiri
67 1
0
Mahaculture Festival in Ratnagiri
132
SHARES
376
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरीत दि. 11 ते 15 फेब्रुवारी रोजी नमन, जाखडी लोककलांसह

रत्नागिरी, ता. 04 : रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये दि. 11 ते 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनाबाबत सामंत यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये बैठक घेतली. बैठकीला एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ‍विपीन शर्मा, जि. प. चेमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत आदी उपस्थित होते. Mahaculture Festival in Ratnagiri

महासंस्कृती महोत्सवानिमित्त दि. ११ फेब्रुवारी रोजी मराठी बाणा, १२ फेब्रुवारी रोजी महानाट्य शिवबा, १३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची संस्कृती, १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची लोकधारा आणि १५ फेब्रुवारी रोजी अवधुत गुप्ते यांचा संगीत प्रधान कार्यक्रम होणार आहे. यावेळी स्थानिक कलाकरांच्या माध्यमातून दररोज नमन, जाखडी अशा लोककलांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. Mahaculture Festival in Ratnagiri

याबाबत पालकमंत्री श्री. सामंत यांनी येणाऱ्या कलाकारांच्या निवास तसेच सादरीकरणाबाबत त्यांना लागणाऱ्या यंत्रणेविषयी सूचना केल्या. २५ बचत गटांच्या स्टॉल सोबतच खादी ग्रामोद्योग, पर्यटन विभागाचे स्टॉल उभे करावेत. शिक्षण विभागाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करावी. त्याचबरोबर सांस्कृतिक चिन्ह स्पर्धा घेण्यात यावी, असेही ते म्हणाले. या पाच दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवासाठी जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवून याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. Mahaculture Festival in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahaculture Festival in RatnagiriMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.