पाटपन्हाळे विद्यालयात विविध विषयांवर मार्गदर्शन उपक्रम
गुहागर, ता. 04 : “मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा व स्वच्छ शाळा ” या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमानिमित्त पाटपन्हाळे विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय ( ज्युनिअर कॉलेज) मधील प्राध्यापक वृंदांनी विविध विषयांवर व्याख्याने सादर करून मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला. Lecture Series on My Beautiful School Activity
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा व स्वच्छ शाळा हा महाराष्ट्र शासनाने उपक्रम राज्यभर राबवण्याचे नियोजन केले असून या उपक्रमासाठी राज्यभरातील शाळांनी सहभाग नोंदवला आहे. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने माझी सुंदर शाळा व स्वच्छ शाळा उपक्रमासाठी सहभाग नोंदवून १५ दिवसांच्या कालावधीत विविध विषयांवर विद्यार्थ्यांना व्याख्यानमालेतून मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी शिक्षक के. डी. शिवणकर यांनी नियोजन केले होते. Lecture Series on My Beautiful School Activity
यावेळी प्रा. एस. पी. वासनिक यांनी जडणघडण व्यक्तिमत्त्वाची, प्रा.जी.डी नेरले यांनी बँकेचे महत्व, प्रा. ए. जे. मयेकर यांनी मानवी उत्क्रांतीची पाऊले, प्रा.पी.आर. इंदुलकर यांनी हसत खेळत गणित, प्रा. सी.एम. बेलवलकर यांनी एप्लीकेशन ऑफ कंडक्टर अँड सेमीकंडक्टर, प्रा.डी. वाय. पवार यांनी पर्यटन गुहागर, प्रा.एस. एस.मोरे यांनी आजचा किशोर व खेळ, प्रा.श्रीम.एम.एस. जाधव यांनी व्यक्तिपरिचय व प्रा. एस. आर. पवार यांनी ऐतिहासिक स्थळे व संवर्धन काळाची गरज या विषयांवर व्याख्यानमालेतून मार्गदर्शन केले. सदरच्या व्याख्यानमालेचा इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना लाभ झाला. प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे व्याख्यानमाला उपक्रम राबविल्याबद्दल मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील यांनी अभिनंदन केले. Lecture Series on My Beautiful School Activity