• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पडवे येथे वर्धापन दिन आणि माघी गणेशोत्सव

by Mayuresh Patnakar
January 22, 2023
in Guhagar
86 1
0
Maghi Ganeshotsav at Padave
170
SHARES
485
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री देव गजाननचा जन्मोत्सव सोहळा

गुहागर, ता. 22 : पडवे येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री देव गजानन मंदिराचा व्दितीय वर्धापन दिन तसेच जन्मोत्सव सोहळा करण्यात येणार आहे. पडवे गणपती मंदिर येथे मिती माघ शुल्क प्रतिपदा शके 1944 रविवार दि. 22 ते माघ शुल्क पंचमी 26 जानेवारी 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Maghi Ganeshotsav at Padave

या उत्सवानिमित्त रविवार दि. 22 रोजी स. 9 वा. श्री देव गजानन मंदिराचा दुसरा वर्धापन दिन, दु. 1.30 वा. श्री. किरण गडदे यांच्या सेवेतून महाप्रसाद रात्रौ 8 ते 9 वा. स्थानिक ग्रामस्थांचे भजन, रात्रौ 9 ते 10 वा. मळण येथील बुवा सुमंत भिडे यांचे सुश्राव्य किर्तन, रात्रौ 10 वा. दत्तकृपा नाट्यमंडळ कुडली तरीबंदर यांचे नमन. सोमवार दि. 23 रोजी रात्रौ 8 वा. स्थानिक ग्रामस्थांचे भजन, रात्रौ 9 वा. मळण येथील बुवा सुमंत भिडे यांचे सुश्राव्य किर्तन रात्रौ 10 वा. लावणी सम्राट कुणाल पाटील यांच्या अस्सल मराठमोळ्या लावणीचा चसका. मंगळवार दि. 24 रोजी दुपारी 3 वा. श्री देव गणपतीची वारी, रात्रौ 8 वा. मळण येथील बुवा सुमंत भिडे यांचे सुश्राव्य किर्तन. बुधवार दि. 25 रोजी  स. 10 वा. श्री. संतोष वामन सुर्वे (खोत) यांचे निवास स्थानातून श्रींची दिंडी मिरवणूक, स. 10.30 वा. स्थानिक ग्रामस्थांचे भजन, स. 11.30 वा. किर्तनातून श्रींचा जन्मकाळ, दु. 1 वा. दिनेश नामदेव सुर्वे यांच्या सेवेतून महाप्रसाद, सायं. 7 वा रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रात्रौ 10 वा. श्री. संतोष वामन सुर्वे (खोत) यांचे निवास स्थानातून श्रींची दिंडी मिरवणूक, रात्रौ 11 वा. गुहागर तालुक्यातील सुप्रसिध्द भजने. गुरुवार दि. 26 रोजी  दु. 2 ते 4 मनोरंजनात्मक कार्यक्रम, दु. 3 वा. सौ. सुप्रिया सुरेश शेट्ये यांच्या सेवेतून महिलांसाठी हळदीकुंकू व रांगोळी स्पर्धा,  रात्रौ 8 वा. प्रश्नमंजुषा व बक्षिस वितरण समारंभ, रात्रौ 10 वा. ढोलवादक व खालुबाजाच्या वाद्याने श्रींची रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 27 रोजी  ललितांचे किर्तनातून उत्सवाची सांगता. Maghi Ganeshotsav at Padave

Maghi Ganeshotsav at Padave

तरी या भक्तिपूर्ण मंगल सोहळ्यास सर्वानी आवर्जून उपस्थित रहावे,  असे आवाहन श्री देव गजानन मंदिर, पडवे यांचेकडून करण्यात आले आहे.  Maghi Ganeshotsav at Padave

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaghi Ganeshotsav at PadaveMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.