वक्तृत्व स्पर्धेत मुक्ता बापट, तपस्या बोरकर प्रथम
रत्नागिरी, ता. 31 : टिळक आळी भगिनी मंडळातर्फे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात मुक्ता बापट व आठवी ते दहावी गटात तपस्या बोरकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. Lokmanya Tilak Jayanti Competition
या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत एकूण 65 स्पर्धक सहभागी झाले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात प्रथम मुक्ता बापट, द्वितीय मनवा जोशी, तृतीय स्पृहा भावे यांनी यश मिळवले. इयत्ता आठवी त दहावीच्या गटामध्ये प्रथम तपस्या बोरकर, द्वितीय श्रिया परब, मंजिरी सावंत (विभागून) आणि तृतीय क्रमांक स्वरा मुसळे हिने प्राप्त केला. Lokmanya Tilak Jayanti Competition
या स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त शिक्षिका सौ. दाक्षायणी बोपर्डीकर आणि प्रा. पंकज घाटे यांनी केले. विजेत्यांना टिळक आळी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष सौ. राधिका वैद्य, उपाध्यक्षा सौ. अर्चना जोगळेकर, सौ. वैशाली जोशी, स्मारकाच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा बापट यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन सौ. तेजस्विनी गाडगीळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. Lokmanya Tilak Jayanti Competition