• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोकसभा निवडणुकांचे ५ टप्प्यात होणार मतदान

by Manoj Bavdhankar
March 16, 2024
in Bharat
130 1
2
Lok Sabha Elections
256
SHARES
730
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवीदिल्ली, ता. 16 : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज लोकसभेचे वेळापत्रक  जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर संपुर्ण देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. Lok Sabha Elections

लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलला पहिला तर २० मे रोजी शेवटचा टप्पा असेल. तसेच तसेच २६ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. Lok Sabha Elections

असे असेल पाच टप्प्यात मतदान 

पहिल्या टप्प्यात (19 एप्रिल) : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर मतदान होईल.
दुसऱ्या टप्प्यात (26 एप्रिल) :  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल.
तिसऱ्या टप्प्यात (7 मे) : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल.
चौथा टप्पा (13 मे) : नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड मतदान होईल.
पाचवा टप्पा (20 मे) : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ. Lok Sabha Elections

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLok Sabha ElectionsMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.