बहुजनांच्या हक्कासाठी वंचितला निवडून द्या, कुमुदिनी चव्हाण यांचे मतदारांना आवाहन
गुहागर, ता. 06 : ३० वर्षे खासदारकी गाजविणारे अनंत गीते व सिंचन घोटाळा प्रकरणातील सुनील तटकरे यांनी सर्वसामान्यांचा विकास न करात केवळ स्वतःचा विकास केला. तटकरे यांनी आपल्या मुलीला व सुपूत्राला आमदार केले. त्यामुळे आपल्याला परिवर्तन करावयाचे असून बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन रायगड लोकसभा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार कुमदिनी चव्हाण यांनी केले. Lok Sabha Elections
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे वंचित बहुजन विकास आघाडीची काँर्नर सभा झाली. यावेळी गुहागर तालुकाध्यक्ष सुनील जाधव आदी उपस्थित होते. कुमुदिनी चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली. मी मराठा समाजाची लेक आहे परंतु आता आंबेडकरी चळवळीमध्ये उतरल्यापासून हा माझा सगळा समुदाय घेऊन मी एकाच विचारावर जात आहे. बाळासाहेबांनी मला उमेदवारी देताना जात-पात पाहिली नाही. आम्ही सगळेजण अनेक जाती धर्माची माणसं फक्त बाळासाहेब आंबेडकरांना समांतर राजकारण करणारी आहोत. त्यांच्यामध्ये सगळ्या जाती-धर्माला एकत्र घेऊन चालण्याची पाँवर आहे. निवडणुकीत तुम्हाला कोणी आमिष दिलं तर ते एक दोन दिवसापर्यंतच असते. परंतु हक्काने जगायचे असेल समस्या सोडवायची असेल तर चांगल्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे. माझ्याबरोबर सर्व समाज आहे. माझ्या प्रचाराला सुरुवात झाल्यापासून आम्ही गाव खेड्यांवर गेलो. खऱ्या समस्या कुठे आहेत तेथपर्यंत पोहोचलो आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसाधारण शिक्षिकेला संधी मिळाली. मी आदिवासी पाड्यांमधील दुःख अनुभवले आहे. म्हणून एवढ्या लोकांचा मला पाठिंबा असल्याचे कुमुदिनी चव्हाण त्यांनी स्पष्ट केले. Lok Sabha Elections


माझ्या समोर प्रतिस्पर्धी कोणीही नाही. मला फक्त यानिमित्ताने विकास करण्याची संधी मिळणार आहे. तटकरे, गीते यांनी रायगड मतदारसंघाचा विकास केलेला नाही. अजूनही आदिवासी पाड्यांचा कायापालट झालेला नाही. रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, त्याचे निकृष्ट बांधकाम, रोजगाराच्या समस्या अजूनही धूळखात आहेत. रायगड मतदारसंघात सर्वाधिक महिला मतदार आहेत. त्यामुळे मला खासदारकी मिळाल्याचा सर्वाधिक आनंद आहे. मला महिलांच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यांच्या हाताला काम द्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले. Lok Sabha Elections