खरे -ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागर
गुहागर, ता. 13 : लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये आपले नाव कसे नोंदवावे, EVM मशिन बाबतची साशंकता, मताचे महत्व, नागारिकांचे कर्तृव्य याबाबत जागृती करण्याचा संदेश खरे -ढेरे-भोसले महाविद्यालय गुहागरच्या (Khare-Dhere-Bhosle College) विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरणातून दिला. या पथनाट्याला प्रा. सौ. बावधनकर मॅडम व प्रा. श्रीमती. कोमल गुरव यांनी मार्गदर्शन केले. Lok Sabha Elections
हे पथनाट्य गुहागर शहरामध्ये गांधी चौक, एस. टी स्टॅंड आणि गुहागर आठवडा बाजारामध्ये सादर करण्यात आले. या पथनाट्याला लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. हे पथनाट्य पाहण्यासाठी नायब तहसिलदार मा. मेहता मॅडम, पंचायत समितीच्या श्रीमती नारवे मॅडम उपस्थित होत्या. तसेच श्री. दे. गो. कृ. माध्य. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री कांबळे, उपमुख्या-ध्यापक श्री. कोरके उपस्थित होते. सदर पथनाट्य गुहागर हायस्कूल, पंचायत समिती शिक्षण विभाग, गुहागर तहसिलदार कार्यालय गुहागर यांच्यावतीने सादर करण्यात आले होते. Lok Sabha Elections