गुहागर, ता. 30 : येथील दिवाणी न्यायालय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती गुहागर येथे न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडिया यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यात पहिल्यांदाच 1 कोटी 10 हजार रुपयांची तक्रार निकाली निघाली आहे. Lok Adalat at Guhagar Court
दि. 27 रोजी पार पडलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतची सुरुवात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या स्वर- संगीताने करण्यात आली. लोकअदातकरीता पक्षकार, वकील वर्ग, बॅंक अधिकारी व पोलीस उपस्थित होते. यावेळी तालुका विधी सेवा समिती गुहागरचे अध्यक्ष श्री. पी. व्ही. कपाडिया यांनी पक्षकारांना आपली प्रकरणे सामंजस्याने तडजोडीने सोडवून पैशाचा व वेळेचा अपव्यय टाळावा असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकअदातीमध्ये फौजदारीकडील परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ ची रक्कम रुपये 1 कोटी 10 लाख रुपयांची तक्रार निकाली काढण्यात आली आहे. Lok Adalat at Guhagar Court
यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. एस.एस. गोसावी, सचिव श्री. एन.जी.गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे बॅंक अधिकारी, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी श्री. ए.बी. भुवड, श्री. आर. आर. चिपळूणकर यांचे योगदान मिळाले. त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ट होण्यापुर्वीच्या प्रकरणांमध्ये 10 लाख नव्वद हजार रुपयांची वसुली करण्यात आली. Lok Adalat at Guhagar Court