डॉ निलेश ढेरे; लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी
गुहागर, ता. 03 : मधुमेह हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. हा आजार लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मधुमेहाचा आजार होण्यामागे प्रामुख्याने खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेली लाईफस्टाईल ही प्रमुख कारणं आहेत यामुळे योग्य आहार विहराची साथ करील मधुमेहावर वर मात असे प्रतिपादन गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश ढेरे यांनी केले. Lions Club of Guhagar


लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात निलेश ढेरे बोलत होते. स्वादुपिंडात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे उद्भवणाऱ्या या आरोग्याच्या समस्येमध्ये आहाराची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. मधुमेहाने उच्च आणि कमी रक्तातील साखरेची पातळी, अंधुक दृष्टीपासून ते किडनी आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजारांपर्यंतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व गुहागर ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अतिमहत्वाची HBA1C टेस्ट शर्करा पातळी, रक्तातील चरबी प्रमाण कावीळ टेस्ट. किडनी फंक्शन टेस्ट याचे मोफत टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. Lions Club of Guhagar


यावेळी लाईन क्लब ऑफ गुहागर सिटी चे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे, मनीष खरे, माधव ओक, संतोष वरंडे, सचिन मुसळे, सुधाकर कांबळे, श्यामकात खातु, डॉ. मयुरेश बेंडल, शैलेंद्र खातू, डॉ. काळे, प्रसाद वैद्य, रविन्द्र खरे तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या अश्रया दहीवलकर, अर्पिता सावंत आदी उपस्थित होते. Lions Club of Guhagar