• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नवानगर येथे मंदिराच्या कळसावर वीज कोसळली

by Mayuresh Patnakar
October 16, 2024
in Guhagar
354 4
0
Lightning struck Navanagar temple
696
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विदयुत उपकरणे निकामी

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वेलदूर नवानगर येथील श्रीराम मंदिराच्या कळसावर वीज कोसळून कळसाला तडे गेल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास घडली. मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिरातील वीज विदयुत उपकरणे जळून खाक झाली आहेत. Lightning struck Navanagar temple

 तालुक्यातील खाडी किनारी वसलेल्या नवानगर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखे श्रीरामाचे मंदिर येथील मच्छीमार बांधवानी बांधले आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने बांधलेले मंदिर अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची साक्ष देतो. या मंदिराचा सुमारे 150 फूट उंचीचा कळस आहे. सोमवारी रात्री परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास  मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. सर्वांचे लक्ष गेले असता वीज पडून कळसाच्या काही भागाची पडझड झाल्याचे आढळून आले. कळसाला ठिकठिकाणी तडेदेखील गेल्याचे नागरिकांना दिसून आले. विजेच्या धक्क्याने मंदिरातील वीज पुरवठा करणारी उपकरणे जळून खाक झाली. प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. Lightning struck Navanagar temple

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLightning struck Navanagar templeMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share278SendTweet174
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.