विदयुत उपकरणे निकामी
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वेलदूर नवानगर येथील श्रीराम मंदिराच्या कळसावर वीज कोसळून कळसाला तडे गेल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास घडली. मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिरातील वीज विदयुत उपकरणे जळून खाक झाली आहेत. Lightning struck Navanagar temple
तालुक्यातील खाडी किनारी वसलेल्या नवानगर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखे श्रीरामाचे मंदिर येथील मच्छीमार बांधवानी बांधले आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने बांधलेले मंदिर अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची साक्ष देतो. या मंदिराचा सुमारे 150 फूट उंचीचा कळस आहे. सोमवारी रात्री परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. सर्वांचे लक्ष गेले असता वीज पडून कळसाच्या काही भागाची पडझड झाल्याचे आढळून आले. कळसाला ठिकठिकाणी तडेदेखील गेल्याचे नागरिकांना दिसून आले. विजेच्या धक्क्याने मंदिरातील वीज पुरवठा करणारी उपकरणे जळून खाक झाली. प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. Lightning struck Navanagar temple