• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नगर वाचनालयास नाममात्र भाडेकराराने जागा

by Guhagar News
March 26, 2024
in Ratnagiri
74 1
3
Library space on nominal lease

Library space on nominal lease

146
SHARES
416
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अॅड. दीपक पटवर्धन; मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न

रत्नागिरी, ता. 26 : रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र, वाचकांची वाचनतृष्णा भागवणाऱ्या रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाच्या ३० वर्षांसाठी जागेचे लीज वाढवून मिळण्यात यश आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हा निर्णय गेल्या महिन्यात झाला. त्याचे अधिकृत पत्र वाचनालयास प्राप्त झाल्याचे अॅड. पटवर्धन म्हणाले. Library space on nominal lease

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे महाराष्ट्रातले सर्वांत जुने १९६ वर्षांचे वाचनालय आहे. १ लाख १३ हजार ग्रंथांनी समृद्ध असलेले ऐतिहासिक परंपरा असलेले वाचनालय एक अत्यंत दर्जेदार वाचनालय म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. या वाचनालयाच्या जागेचा भाडेपट्टा १९९२ मध्ये संपुष्टात आला होता. १९५१ पूर्वीपासून हे वाचनालय सध्या आहे त्या जागेवर उभे आहे. मात्र ही जागा नगरपालिकेची व इमारत नगर वाचनालयाच्या मालकीची अशी स्थिती आहे. भाडेपट्टा वाढवून मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न झाले. मात्र राजकीय हेवेदाव्यातून हे प्रकरण मार्गी लागत नव्हते. Library space on nominal lease

अॅड. पटवर्धन यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा विषय मांडला. भाजपा जिल्हाध्यक्ष असताना मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र अनेक तांत्रिक गोष्टींची अडचण येत होती. अखेर मंत्री सामंत यांनी आपला प्रभाव वापरून सर्व तांत्रिक अडचणी दूर करत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडून वाचनालयाला २०१८ पासून ३० वर्षासाठी नाममात्र १ रुपया भुईभाड्याने आहे ती संपूर्ण जागा उपलब्ध करू दिली. शासनाने रत्नागिरी नगर वाचनालयास ३० वर्षे मुदतीने जागा देण्याचा शासन निर्णय १३ फेब्रुवारी रोजी पारीत झाला. Library space on nominal lease

अनेक वर्षे रत्नागिरी नगर वाचनालयाच्या जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री, रत्नसिंधू योजनेचे संचालक किरण तथा भैय्या सामंत, रत्नागिरी नगरपालिका, जिल्हाधिकारी या सर्वांना धन्यवाद दिले आहेत. खूप किचकट असणारे हे प्रकरण अनंत अडचणी दूर करत मार्गी लागले, याचे खूप समाधान आहे. आता नव्या इमारीचा मार्ग मोकळा होईल, अशी प्रतिक्रियाही अॅड. पटवर्धन यांनी दिली. Library space on nominal lease

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLibrary space on nominal leaseMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यानगर वाचनालयमराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.