27 दिवसांपूर्वीची घटना, सामाजिक माध्यमांमुळे पुन्हा चर्चेत
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील उमराठ गावात 3 ऑगस्टला बिबट्याचे पिल्लु सापडले होते. दोन दिवस वनरक्षकांनी हे पिल्लु शोधण्यासाठी त्याची आई येईल म्हणून गावात देखरेख ठेवली. पिल्ल्याचे संगोपन केले. बिबट्याच्या पिल्लाला न्यायला आई येत नाही हे निश्चित झाल्यावर वन विभागाने या पिल्लाची रवानगी बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात केली. मात्र सध्या सामाजिक माध्यमांमुळे बिबट्याचे पिल्लु पुन्हा चर्चेत आले आहे. Leopard cub safe in national park
३ ऑगस्टला मुसळधार पावसात रात्री वाट चुकलेले बिबट्याचे एक पिल्लु उमराठ बौध्दवाडीतील प्रशांत कदम यांच्या घराजवळ ओरडत असताना प्रशांत कदम यांना दिसले. हे पिल्लु पावसात भिजल्याने गारठले होते. प्रशांत कदम आणि बौध्दवाडीतील मंडळीं त्या रात्री या पिल्लावर लक्ष ठेवून होती. त्याची आई त्याला घेवून जाईल अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र त्या रात्री बिबट्याचे पिल्लु न्यायला आई आली नाही. 4 ऑगस्टला या पिल्लाला ग्रामस्थांनी आसरा दिला. दूध दिले. रविवारच्या रात्री देखी त्याची आई पिल्लाला न्यायला येईल अशी अपेक्षा होती. परंतु सोमवारी सकाळपर्यंत पिल्लु बौध्दवाडीतच होते. दरम्यानच्या काळात बिबट्याची काळजी ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे ते पिल्लु माणसाळले. अवघे 1 महिन्याचे हे पिल्लु आता गावातील लोकांसाठी चर्चेचा विषय बनला होता. ग्रामपंचायत उमराठने वन विभागाला या पिल्लाबाबतची माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी उमराठ गावात येण्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना बिबट्याचे पिल्लु कसे दिसते हे दाखवावे म्हणून काहीजणांनी शाळेत नेले. तिथे शाळकरी मुले त्याच्याजवळ खेळली. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पिल्लु ताब्यात घेवून शृंगारतळीला नेले. त्यानंतर आणखी दोन रात्री वन विभागाचे अधिकारी पिल्लाला उमराठमध्ये घेवून आले. आपल्या पिल्लाच्या शोधात असलेली मादी पिल्लाला न्यायला येईल अशी अटकळ होती. त्यामुळे आजुबाजुच्या परिसरात 3 नाईट व्हिजनचे कॅमेरे वन विभागाने लावले होते. परंतु बुधवार रात्रीपर्यंत पिल्लाला न्यायला आई आलीच नाही. अखेर गुरुवारी 8 ऑगस्टला वन विभागाने हे पिल्लु मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. Leopard cub safe in national park
या कालावधी बिबट्याच्या पिल्लाबरोबरचे ग्रामस्थांचे तसेच शाळेतील फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे उमराठ मध्ये सापडलेले बिबट्याचे पिल्लु चर्चेत होते. ८ ऑगस्टनंतर या विषयाची चर्चा थांबली होती. आज 30 ऑगस्टला पुन्हा एकदा सामाजिक माध्यमांवर जिल्हा परिषद शाळा उमराठमधील बिबट्याच्या पिल्लाबरोबर खेळतानाचे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे परत एकदा उमराठ मधील बिबट्याचे पिल्लु चर्चेत आले. Leopard cub safe in national park
याबाबत बोलताना उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर म्हणाले की, बिबट्याचे ते पिल्लु केवळ रविवार 4 ऑगस्ट आणि सोमवार 5 ऑगस्ट असे दोन दिवस ग्रामस्थांकडे होते. अवघ्या महिनाभराच्या पिल्लाचे संगोपन ग्रामस्थांनी केले. त्यावेळी काही गोष्टी चुकीच्या घडल्या. त्या तातडीने आम्ही थांबवल्या. पुढील 4 दिवस बिबट्याचे पिल्लु वन विभागाच्या ताब्यात होते. आज व्हायरल झालेला व्हिडिओ व बातम्या या महिनाभरापूर्वीच्या आहेत. Leopard cub safe in national park
या घटनेची दखल वन विभागाने घेतली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबच्या नोटीसाही त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या बाबतीत असे कोणतेही कृत्य कोणीही करु नये. – राजश्री कीर, परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण Leopard cub safe in national park