• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेड येथे कायदेविषय मार्गदर्शन कार्यक्रम

by Guhagar News
February 1, 2025
in Ratnagiri
83 1
0
Legal Guidance Program at Khed
164
SHARES
468
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : ना.उच्च न्यायालय, मुंबई, विधी सेवा प्राधिकरण मुंबई, मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी व तालुका विधी सेवा समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८/०१/२०२५ रोजी नगर परिषद सभागृह  खेड येथे कायदेविषय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला जिल्ह न्यायाधीश-१ व अति.सत्रन्यायाधीश, खेड तथा  अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती खेड मा.श्री.पी.एस.चांदगुडे व श्री.मनोद व्ही.तोकले, दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, खेड व श्री.रोडगे मुख्याधिकारी नगरपरिष, खेड हे उपस्थित होते. Legal Guidance Program at Khed

सदर कार्यक्रमामध्ये जिल्हा न्यायाधीश-१ व अति.सत्रन्यायाधीश, खेड तथा  अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती खेड  मा.श्री.पी.एस.चांदगुडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाची तरतूद कायदा 2013 (Provision of theSexual Harrasment of women at workplace Act 2013) याविषयावर मार्गदर्शन केले. मा.श्री.पी.एस.चांदगुडे यांनी या कायदया खालील तरतुदी काय आहेत तसेच प्रत्येक कामाच्या ठिकाणी  या कायद्याचा उद्देश महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांना रोखणे आणि त्यांचे निराकरण करणे आणि अशा छळाशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा प्रदान करणे हा आहे. प्रत्येक कंपनी,  कार्यालये, सरकारी वा खाजगी कार्यालये यांच्या आस्थापनांनी कार्यालयात होणारे महिलांबाबतचे गैर प्रकार रोखण्यासाठी लैंगिक छळ तक्रार निवारण समितीची स्थापना करणे बांधनकारक आहे. या समितीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही होणे गरजेचे आहे. तक्रार समितीने चौकशी अहवाल कार्यालयाला सादर करणे बंधनकारक आहे. तसेच तक्रार निवारण समितीने सुचवलेल्या सूचना अंमलात आणण्याची जबाबदारी मालकाची अथवा जबाबदार अधिका-याची राहील. Legal Guidance Program at Khed

Big boost to Maharashtra's development

श्री.मनोद व्ही.तोकले, दिवाणी न्यायाधीश,व.स्तर, खेड यांनी वैकल्पिक विवाद निराकरण पद्धत आणि त्याचे फायदे.(Alternativedispute resolution (ADR)method and it’s  benifits) याविषयावर मार्गदर्शन करताना वैकल्पिक विवाद निराकरण (ADR)ही न्यायालयाबाहेर विवादांचेनिराकरण करण्याची पद्धत आहे. या पद्धतीत, लवाद, मध्यस्थी, सलोखा अशा पद्धतींचा वापर करून विवाद सोडवले जातात. लोकअदालत ही वैकल्पिक विवाद निराकरणाची एक पद्धत आहे. वैकल्पिक विवाद निराकरणाचे फायदे म्हणजे वेळेची बचत होते, खर्च कमी होतो, न्यायिक व्यवस्थेवरील भार कमी होतो, परवडणारा, जलद आणि सुलभ न्याय मिळतो. वैकल्पिक विवाद निराकरणाचे प्रकार लवाद,मध्यस्थी, सलोखा,लोकअदालत असे आहेत. भारतात वैकल्पिक विवाद निराकरणाची स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14आणि 21च्या आधारावर करण्यात आली आहे.  Legal Guidance Program at Khed

सदर कार्यक्रमाला नगरपरिषद, महसूल व तहसिलदार कार्यालयामधील महिला कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका विधी सेवा समिती खेड चे कर्मचारी श्री.राजेश चिपळूणकर, श्री.जितेंद्र आंबेकर यांनी परिश्रम घेतले. Legal Guidance Program at Khed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLegal Guidance Program at KhedMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.