• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत येथे कायदेविषयक मार्गदर्शन व्याख्यान

by Ganesh Dhanawade
September 28, 2024
in Guhagar
143 2
0
Legal Guidance in Palashet
282
SHARES
805
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय आणि ज्यु. कॉलेज येथे संपन्न

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पालशेत विद्यालय येथे दि. २५/०९/२०२४  रोजी ‘तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत मा.श्री.पी.व्ही.कपाडीया अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश,  कनिष्ठ स्तर, गुहागर यांचे ”पिडीत  व्यक्तीसाठी नुकसान भरपाईच्या योजना’  या विषयावर तसेच सौ.एम.एन.सोमण पॅनल विधीज्ञ यांचे ‘स्वच्छता विषयी जनजागृती’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. Legal Guidance in Palashet

सर्वप्रथम ‘स्वच्छता जनजागृती’ विषयावर बोलताना विधीज्ञ सौ. सोमण मॅडम यांनी स्वच्छतेचे महत्व  विद्यार्थ्यांना पटवून देताना स्वत:हून आपण स्वच्छतेचे नियम आत्मसात केले पाहिजेत हे सांगताना घरपरिसरातून ते बाह्य परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याची प्रतवारी करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे या गोष्टींवर भर दिला. Legal Guidance in Palashet

अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश,  कनिष्ठ स्तर, गुहागर मा.  श्री. कपाडिया सर यांनी ‘पिडीतांच्या समस्या आणि नुकसान भरपाई’ विषयावर मार्गदर्शन करताना समाजातील वंचीत पिडीत घटकांना शासकीय योजनांमार्फत मदतीचा हात कसा मिळतो, त्याकरीता कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करावा यावर सविस्तर चर्चा केली. निसर्ग निर्मित तथा मानवनिर्मित आपत्तींपासून होणारे नुकसान आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या शासकीय योजना यांचे यथोचित मार्गदर्शन देखील त्यांनी केले. Legal Guidance in Palashet

 कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री. विचारे सर यांनी केले.  सदर कार्यक्रमास मा. मुख्याध्यापक श्री.जोगळेकर  तथा सर्व प्राध्यापक वर्ग हजर होते. कार्यक्रमाचे आभार श्री. पाटील सर यांनी मानले.  कार्यक्रमास मा. दिवाणी न्यायालय गुहागरचे कर्मचारी श्री.राजेश चिपळूणकर, श्री.सुनिल माने व श्री. निसार खेरटकर उपस्थित होते. Legal Guidance in Palashet

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLegal Guidance in PalashetMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share113SendTweet71
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.