• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खामशेत येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

by Guhagar News
April 30, 2025
in Guhagar
205 2
0
Legal Guidance Camp at Khamshet
403
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिवाणी न्यायालय गुहागर व विधी सेवा समिती गुहागरमार्फत आयोजन

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील ग्रा.पं. खामशेत येथील सभागृहात दिवाणी न्यायालय गुहागर व विधी सेवा समिती गुहागरमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. स्त्री भ्रूणहत्या या विषयावरती कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Legal Guidance Camp at Khamshet

या मार्गदर्शन शिबिरामध्ये विधी सेवा समिती गुहागरचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी.व्ही.कपाडीया यांनी कायद्यामधील तरतुदी लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या. तसेच गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी कायद्याची पार्श्वभूमी आणि प्रस्तावना केली. ज्यामध्ये हा कायदा लागू करण्याची वेळ का आली? या संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन केले. Legal Guidance Camp at Khamshet

या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी शेखर भिलारे, वकील श्रीमती प्रितम कपाडिया, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शरद भांड, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका श्रीमती महाडिक, श्रीमती गुरव, सरपंच मंगेश सोलकर, उपसरपंच विष्णू पारदळे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा माचिवले, अस्मिता कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष शशिकांत गुडेकर, पोलीस पाटील संजय माने, ग्रामपंचायत अधिकारी आर ए मोहिरे यांच्यासह वाडी अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते. Legal Guidance Camp at Khamshet

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLegal Guidance Camp at KhamshetMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share161SendTweet101
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.