• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन

by Ganesh Dhanawade
August 28, 2024
in Guhagar
97 1
2
Legal Guidance at Regal College
190
SHARES
542
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‘रॅगिंग विरोधी कायदे व वाहतूक नियम’ या विषयावर संपन्न

गुहागर, ता. 28 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये (Regal College) तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष व गुहागर दिवाणी न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडिया यांचे रॅगिंग विरोधी कायदे या विषयावर तर पॅनल विधीज्ञ श्री. एस. जी. अवेरे यांचे  वाहतूक नियम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. Legal Guidance at Regal College

यावेळी रिगल कॉलेज प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये रिगल कॉलेज शृंगारतळी येथे उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक कोर्सेसची माहिती दिली व त्यानंतर श्री. पी. व्ही. कपाडिया व श्री. एस. जी. अवेरे यांचा  शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. आपल्या ‘वाहतूक नियम’ या विषयावर  श्री. अवेरे यांनी मोटर वाहन कायदा 1 जुलै 1988 अंतर्गत असलेल्या विविध नियमांची ओळख करून दिली. तसेच वाहतूक शाखेची कर्तव्ये व त्यांना असलेल्या विविध अधिकारांबद्दल विस्तृतपणे माहिती दिली. Legal Guidance at Regal College

दिवाणी न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडिया यांनी आपल्या  ‘रॅगिंग विरोधी कायदे’ या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये रॅगिंग विरोधी कायदा 1999 याची माहिती दिली. याअंतर्गत रॅगिंग म्हणजे काय, तसेच रॅगिंग झाल्यावरती विद्यार्थ्यामार्फत कोण तक्रार करू शकतो. रॅगिंग केल्यावर असलेल्या कायदेशीर शिक्षा याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर सेंटर फॉर युथ या वेबसाईटची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे तसेच जनजागृती करणे हा या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली मिरगल यांनी केले. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे न्यायालयीन कर्मचारी श्री. राजेश चिपळूणकर, श्री. नागोराव सरकुंडे, श्री.निसार खेरटकर, रीगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. Legal Guidance at Regal College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLegal Guidance at Regal CollegeMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.