महर्षी परशुराम अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजन
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांच्या वेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण सेंद्रिय शेती व व्यवसायातील संधी यावर दि. २२/०२/२०२४ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी गुहागर ऑरग्यानीक प्रोड्यूसऱ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदार जोशी उपस्थित होते. Lectures at Velneshwar College
श्री. मंदार जोशी यांनी सेंद्रिय शेतीतील मूलभूत संकल्पना, सेंद्रिय शेतीचे फायदे, रासायनिक शेतीचे मानवी आरोग्य व पर्यावरणावरील घातक परिणाम, विविध संशोधने, शेती व्यवसायासाठी विविध सरकारी योजना या संदर्भात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. याबरोबरच त्यांचा शिक्षण व कंपनी स्थापनेपर्यंतचा प्रवास उलगडला. Lectures at Velneshwar College
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाकडून विद्या प्रसारक मंडळ, ठाणेचे कार्याध्यक्ष, डॉ. विजय बेडेकर, महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. नरेंद्र सोनी, विभागप्रमुख प्रथम वर्ष अभियांत्रिकी डॉ. गणेश दिवे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी श्री अमित जोशी (सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र), सौ. गौरी दांडेकर जोशी ( सहाय्यक प्राध्यापिका, गणित ) यांनी विशेष मेहनत घेतली. Lectures at Velneshwar College