रत्नागिरी, ता. 13 : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंदांच्या 50 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात उद्या दि. १४ सप्टेंबरपासून दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. स्वामी स्वरूपानंदांनी रचिलेल्या अभंगांवर ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. Lecture Series at Swami Swarupananda Temple
या व्याख्यानमालेचे तिसरे सत्र उद्या दि. 14 व रविवारी दि. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळात अध्यात्म मंदिरात होणार आहे. उद्या डॉ. सौ. निशिगंधा पोंक्षे या आता ‘मज एक विठ्ठलाचा छंद’ या अभंगावर निरुपण करुन गुंफणार आहेत. रविवारी सौ. अंजली साने (चिपळूण) या ‘मन हे चंचल स्वभावे ओढाळ’ या अभंगावर निरूपण करुन गुंफणार आहेत. या कार्यक्रमात ज्या अभंगावर वक्ते निरुपण करणार आहेत, त्या अभंगाचे गायन विजय रानडे हे करणार आहेत. अभंगाला त्यांनीच संगीत दिले आहे. श्रोत्यांनी या निरुपणाचा अवश्य लाभ घ्यावा, अशी विनंती स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ व अध्यात्म मंदिर, रत्नागिरी व्यवस्थापन कमिटी यांनी केली आहे. Lecture Series at Swami Swarupananda Temple