गुहागर, ता. 13 : विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन दि.11-10-2023 रोजी करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. स्वप्नील गुप्ते (रिजेंट रिसॉर्ट ,मॅंगो व्हिलेज गुहागर)व त्यांचे सहकारी प्रथमेश पाटील (परचेस एक्सीक्युटीव्ह)हे उपस्थित होते. Lecture at Regal College Sringaratali
सर्व प्रथम हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख प्रा.शैलेश घाणेकर यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. सदर व्याख्यानामध्ये मा.श्री. स्वप्निल गुप्ते सर यांनी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये होणारे नवनवीन बदल याविषयावर व्याख्यान दिले. त्यात त्यांनी हॉस्पिटॅलिटी म्हणजे नेमके काय हे सांगताना लॉजिंग, रेस्टॉरंट, इव्हेंट प्लॅनिंग,थीम पार्क्स, ट्रान्सपोट्रेशन कुझ, टुरिझम इंडस्ट्री ई.ची माहिती दिली. त्यानंतर पर्यटन विभागासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले कि, धार्मिक, मनोरंजन, व्यावसायिक, दैनंदिन बदलासाठी तसेच शिक्षण, स्पोर्ट्स, आरोग्य या अनुषंगाने लोक स्थानिक आणि जागतिक स्तरावर पर्यटन करतात. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये होणारे नवनवीन बदल स्मार्ट हॉटेल टेक्नॉलॉजी, त्यात पर्यावरण संवर्धनाचा उद्देश ठेवून तयार केले जाणारे हॉटेल्स, रोबोट स्टाफ, युनिक एक्सपिरीयन्स, शेअरिंग इकॉनॉमी, आभासी वास्तव (3D)इ.विषयी विस्तृत माहिती दिली. Lecture at Regal College Sringaratali
सदर व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना हॉटेल्स व्यतिरिक्त पर्यटन क्षेत्र, कुझ, इव्हेंट प्लॅनिंग, रेस्टॉरंट्स इ.क्षेत्रांमध्ये सुद्धा नोकरीच्या संधी कशा मिळवाव्या हे समजले त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये कोणकोणते व्यवसाय करता येतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले. त्या व्याख्यानासाठी हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमाच्या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.संजयराव शिर्के सर, संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Lecture at Regal College Sringaratali