उद्या ३ मार्च रोजी आदरांजली सभेचे आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता . 02 : ग्रामपंचायत खोडदेचे सरपंच श्री.लवेश यशवंत पवार (वय ५०) यांचे दि. २५ फेब्रुवारी रोजी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. यांच्या पाश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिणी, २ बहिणी, भावोजी असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुण्यानूमोदन धम्म संस्कार आणि आदरांजली सभा उद्या रविवार दि. ३ मार्च रोजी खोडदे येथील त्यांच्या रहात्या घरी आयोजित करण्यात आली आहे. Lavesh Pawar is No More
दिवंगत श्री.लवेश यशवंत पवार हे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळीत अग्रेसर असणारे तसेच बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर विभाग नं.६ या धम्म संघटनेचे माजी अध्यक्ष व बौद्धजन सहकारी संघ शाखा खोडदे या धम्म संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. दिवंगत श्री.लवेश यशवंत पवार यांच्या पुण्यानूमोदन धम्म संस्कार आणि आदरांजली सभेला खोडदे येथील महिला – पुरुष बंधू – भगिनींनी वेळेत उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन पवार कुटुंबीयांनी व बौद्धजन सहकारी संघ शाखा खोडदे गाव मुंबई या संघटने कडून करण्यात आले आहे. Lavesh Pawar is No More