गुहागर, ता. 28 : विवाहासाठी अनुरूप वधू किंवा वर यांची निवड हा एक काळजीचा विषय बनत चालला आहे. शिक्षणामुळे मुले-मुली भवितव्याबद्दल जागरूकपणे विचार करू लागल्या आहेत. त्यांना आपल्या भविष्यातील स्वप्नांना साजेसा, आपल्या योग्यतेचा, आवडीचा अनुरूप जोडीदार हवा आहे. मनातील स्वप्नांना साजेसा आयुष्याचा साथीदार शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना घरबसल्या बळ देण्यासाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) या संस्थेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. Launch of Teli Samaj Vadhuvar Indicative Website


इंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय पण जगभरातील वधू – वरांची माहिती घरबसल्या मिळावी व विवाह योग्य उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे तसेच वधु वरांचे विवाह कमीत कमी वेळेत व कमी खर्चात होण्यासाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाने www.telijodidar.com हे विवाह विषयक वेब पोर्टल व telijodidar अॅप सर्वांसाठी खुले केले आहे. सदर वेबपोर्टल मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. याठिकाणी उपवर डेटाबेसच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते. Launch of Teli Samaj Vadhuvar Indicative Website
या वेब पोर्टल व अॅपचे डिझाईन संस्थेचे सदस्य श्री.विलास किर्वे (वरवेली), ग्राफिक्स डिझाईन श्री.प्रविण प्रकाश रहाटे (गुहागर), संपूर्ण लेखन श्री.दिनेश खेडेकर (अडूर), अन्य तांत्रिक सहाय्य प्रशांत रहाटे (गुहागर), ऋषिकेश रहाटे (गुहागर), रसिका नाचणकर (रत्नागिरी), अस्मिता झगडे (अडूर), शुभाली सकपाळ (राजापूर) या सदस्यांनी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली हे काम कमी वेळेत पूर्णत्वास नेले. यावेळी गुहागर तालुका बेसिक कमिटी, युवा समिती, महिला समिती तसेच रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे विशेष सहकार्य लाभले. सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू- भगिनींनी लाभ घेऊन, समाज एकसंघ राहण्यास हातभार लावावा, असे आवाहन गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने करण्यात येत आहे. Launch of Teli Samaj Vadhuvar Indicative Website