गुहागर, ता. 31 : एजिस हेल्थकेअर ( पूर्वीचे स्पंदन क्लिनिक) द्वारे मल्टीस्पेशालिटी आणि इंडस्ट्रियल ट्रॉमा केअर या आरोग्य सेवेचा शुभारंभ नुकताच हॉटेल ओमेगा शेजारी, खेर्डी येथे करण्यात आला. या सुविधेअंतर्गत अपरांत मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचा सर्जरी, मेडिसिन व ऑर्थोपेडिक विभाग, हृदयविकार व मधुमेहाच्या रिव्हर्सल ट्रीटमेंट्ससाठी सुप्रसिद्ध माधवबाग क्लिनिक, कोकणवासीयांचे हक्काचे त्वचा व सौंदर्य उपचार क्षेत्रातील आघाडी चे नाव स्प्रिंग स्किन अँड हेअर लेसर क्लिनिक, डॉ पूर्वा भास्करवार यांचे अत्याधुनिक दंतोपचारासाठी सिद्धी विनायक डेंटल स्पेशालिटी क्लिनिक, डॉ ऋषीकेश बर्वे यांचे डाएट व न्युट्रीशन क्लिनिक या आरोग्य सेवांसोबतच डॉ सुरज शिकलगार यांची MD पॅथॉलॉजिस्ट संचालित इन्स्टा केअर ही अद्ययावत पॅथॉलॉजी लॅब, डिजिटल एक्स-रे युनिट, इसीजी सेवा व 24 तास ॲम्बुलन्स ची उपलब्धता या सुविधा खेर्डी तील नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. Launch of Multi Specialty at Kherdi
खेर्डी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी ट्रॉमा केअर आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या ऐजीस हेल्थकेअर मल्टी स्पेशलिटी व इंडस्ट्रियल हेल्थ क्लिनिकमध्ये सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये अपरांत हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर सद्गुरु पाटणकर, डॉ भक्ती पालांडे आणि ऑर्थोपेडिक व जॉइन्ट रिप्लेसमेंट कन्सल्टंट डॉ.श्रीश भास्करवार उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी 1 ते 2 या वेळेमध्ये अपरांत चे फिजिशियन डॉ हर्षद होन यांचे द्वारे रुग्ण तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कोणत्याही आपत्कालीन रुग्णांसाठी 24 तास तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. माधवबाग क्लिनिक चिपळूणच्या डॉ.राधा मोरे, डॉ स्नेहल नांगरे यांचे द्वारे डायबिटीस व हृदय रोगांच्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचार व आधुनिक चिकित्सा उपलब्ध होणार आहे. Launch of Multi Specialty at Kherdi
दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी डॉ.पूर्वा भास्करवार ( MDS) यांचे द्वारे स्पेशालिटी डेंटल क्लिनिक चालविले जाणार आहे. तर स्प्रिंग स्किन अँड हेअर लेसर क्लिनिक, चिपळूण या नामवंत संस्थेद्वारे सौंदर्य व लेसर चिकित्सा आणि त्वचा, केस आणि नखे यांच्या विकारांसाठी तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सर्व सेवांसोबतच डाएटीशन आणि 24 तास ॲम्बुलन्स सेवा देखील पुरविण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या आजारांच्या तपासणीची विशेषज्ञ सेवा व तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स यांची उपस्थिती यामुळे एजिस हेल्थकेअरचा हा लोकाभिमुख आरोग्य उपक्रम खेर्डी परिसरातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण हेल्थ केअर सेट अप ठरला आहे. एजिस च्या इंस्टा केअर लॅब या उपक्रमाद्वारे घरबसल्या ऑन लाइन पॅथॉलॉजी टेस्टस् ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे रिपोर्ट घरपोच मिळतील. ऐजिस च्या या सर्व अत्याधुनिक सुविधांचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन टीम एजिस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी ☎ 9420879295 या नंबरवर संपर्क करावा. Launch of Multi Specialty at Kherdi