जमिनीचा काही भाग नदीमध्ये कोसळला
गुहागर, ता. 19 : तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे काल गुहागर शीर ते जामसुत मार्गावरील वासुदेव पाटील यांच्या घराजवळ रस्त्यालगत भुस्खलन होऊन जमिनीचा काही भाग नदीमध्ये कोसळला आहे. त्यामुळे सदरच्या ठिकाणी भविष्यात भुस्खलनामुळे शीर – महालक्ष्मी – जामसुत वाहतूक ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. Landslide in Guhagar Sheer
गुहागर तालुक्यामध्ये अति मुसळधार पावसामुळे भुस्खलनाच्या तसेच डोंगर खाली येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसापूर्वी गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथेही डोंगर खचून पूर्ण रस्त्यावरती आला होता. तसेच काल शिर महालक्ष्मी जामसुत मार्गा लगतचा जमिनिचा काहिसा भाग भुस्खलन होऊन बाजूला असणाऱ्या नदीमध्ये कोसळला आहे. तसेच असाच मुसळधार पाऊस सुरू राहिला तर वाहतुकीलाही धोका निर्माण होऊ शकतो. तरी संबंधित विभागाने याची तातडीने दखल घ्यावी, असे सरपंच ग्रामपंचायत शीर यांना कळवले आहे. जामसूत मार्गे शिर महालक्ष्मी रोड गुहागर-आबलोली रोडला येऊन मिळतो. त्यामुळे शीर मध्ये जाणारी वाहतूक याच मार्गावरून नेहमी जात असते त्यामुळे याच्याकडे लक्ष द्यावे, असे संबंधित विभागाला कळवले आहे. Landslide in Guhagar Sheer