संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 02 : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा गुहागर, आणि सह्याद्री समाचार आयोजित शाहीर शाहिद आदम खेरटकर लिखित आणि “शब्दाली प्रकाशन,पुणे” प्रकाशित “ललकारी” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बाळशास्त्री जांभेकर सभागृह, लोकमान्य टिळक वाचनालय, जुना भैरी मंदीराजवळ, चिपळूण येथे दि. ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता प्रसिद्ध अभिनेते, लेखक, चित्रपट कथाकार, कादंबरीकार, श्री.अभिराम भडकमकर (मुंबई)यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. “Lalkari” Anthology Release Ceremony
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, शृंगारतळी हे असणार आहेत. प्रमुख भाष्य : डॉ. संजय बोरूडे, प्रसिद्ध साहित्यिक, अहमदनगर यांचे असणार आहे तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील, (सांगली) हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत मा. आमदार, श्री.शेखर निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी,चिपळूण मा.श्री.राजेंद्रकुमार राजमाने, प्रसिद्ध उद्योजक श्री प्रशांतजी यादव, मनसे संपर्क प्रमुख गुहागर, श्री प्रमोदजी गांधी, अध्यक्ष-पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था, श्री.अनंतराव पालांडे, दिगंत डोंबिवली भूषण, मा.श्री.विद्याधर भुस्कूटे, मा. श्री. शाहीर दत्ताराम आयरे(ज्येष्ठ कलावंत), मा.श्री.शाहीर एकनाथ माळी (ज्येष्ठ कलावंत), मा.श्री.विकास (अण्णा) जाधव (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), मा.श्री. सिध्देश ब्रीद (युवा उद्योजक), सौ.नमिता कीर (केंद्रीय अध्यक्षा को.म.सा.प.) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा रंगणार आहे. “Lalkari” Anthology Release Ceremony
शाहीर शाहिद खेरटकर यांनी गेली अनेक वर्षे शाहीर म्हणून आपली कला जोपासली आहे,या दरम्यान वेगवेगळ्या आशयाची गाणी,पोवाडे,प्रबोधनात्मक कवणे त्यांनी लिहली आणि सादर केली.परंतु त्यांच्या कविता देखील अनेक साहित्य संमेलनात श्रोत्यांना ऐकायला मिळाल्या आहेत;यातीलच काही मोजक्या समतावादी विचारधारेला अभिप्रेत असलेल्या तसेच विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कवितांचा समावेश असलेला”ललकारी” हा कविता संग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे.सर्व साहित्यप्रेमींनी सदर प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन शाहीर शाहिद खेरटकर यांनी केले आहे. “Lalkari” Anthology Release Ceremony