• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तेली समाज सेवा संघातर्फे लक्ष्मी पूजन सजावट स्पर्धा

by Manoj Bavdhankar
January 31, 2024
in Guhagar
110 1
1
Lakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva Sangh

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या तालुक्यातील तेली समाजातील महिला वर्ग

217
SHARES
619
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुकास्तरीय ऑनलाईन स्पर्धेत स्नेहा रसाळ विजेती; हळदी कुंकू कार्यक्रम दरम्यान सन्मान

गुहागर, ता. 31 : तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) च्या वतीने खास महिलांसाठी मार्गशीर्ष मास विशेष तालुकास्तरीय ऑनलाईन घरगुती लक्ष्मी पूजन सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धार्मिक संस्कृती रुजविण्यासाठी महिला वर्गाकडून होत असलेल्या प्रयत्नांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Lakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva Sangh

सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संस्थेच्या वार्षिक महिला हळदी कुंकू समारंभ दिवशी संपन्न झाला. यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक विजेत्या सौ.स्नेहा संदेश रसाळ ( काताळे, सध्या वास्तव्य- पुणे), द्वितीय क्रमांक विजेत्या सौ.माधवी ओंकार रसाळ (वरवेली) आणि तृतीय क्रमांक विजेत्या सौ.सुहासिनी सुभाष पवार (काजुर्ली) या विजेत्या ठरल्या. यावेळी तालुक्यातील ६४ गावातील एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सर्वोत्तम तीन सजावट विजेत्यांना संस्थेतर्फे ग्रंथभेट, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून युवा सचिव दिनेश महादेव खेडेकर यांनी काम पाहिले. Lakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva Sangh

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) च्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या महिला मंडळाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रम दरम्यान महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. Lakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva Sangh

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva SanghLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.