तालुकास्तरीय ऑनलाईन स्पर्धेत स्नेहा रसाळ विजेती; हळदी कुंकू कार्यक्रम दरम्यान सन्मान
गुहागर, ता. 31 : तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) च्या वतीने खास महिलांसाठी मार्गशीर्ष मास विशेष तालुकास्तरीय ऑनलाईन घरगुती लक्ष्मी पूजन सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धार्मिक संस्कृती रुजविण्यासाठी महिला वर्गाकडून होत असलेल्या प्रयत्नांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Lakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva Sangh
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संस्थेच्या वार्षिक महिला हळदी कुंकू समारंभ दिवशी संपन्न झाला. यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक विजेत्या सौ.स्नेहा संदेश रसाळ ( काताळे, सध्या वास्तव्य- पुणे), द्वितीय क्रमांक विजेत्या सौ.माधवी ओंकार रसाळ (वरवेली) आणि तृतीय क्रमांक विजेत्या सौ.सुहासिनी सुभाष पवार (काजुर्ली) या विजेत्या ठरल्या. यावेळी तालुक्यातील ६४ गावातील एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सर्वोत्तम तीन सजावट विजेत्यांना संस्थेतर्फे ग्रंथभेट, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून युवा सचिव दिनेश महादेव खेडेकर यांनी काम पाहिले. Lakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva Sangh
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर (रजि.) च्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या महिला मंडळाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रम दरम्यान महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. Lakshmi Poojan Decoration Competition by Teli Samaj Seva Sangh