गुहागर नगरपंचायत; गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान
गुहागर, ता. 21 : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (moHUA) , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वछता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले होते . त्यानुषंगाने गुहागर नगरपंचायत मा. मुख्याधिकारी श्री स्वप्नील चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज 21/09/2024 रोजी सकाळी 8 वाजता स्वच्छता ही सेवा अंतर्गत गुहागर बीच येथे एक दिवस श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. Labor donation activity under cleanliness service
सदर उपक्रमात स्वच्छता गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, गुहागर नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव सर, शहर समन्वयक अक्षय सावंत, स्वच्छता विभाग लिपिक सुनील नवजेकर, गुहागर हाय स्कूल चे मुख्याध्यापक कांबळे सर, गंगावणे सर, अविनाश गमरे सर, कांबळे मॅडम, पाकले मॅडम, तांबड मॅडम, NCC चे ढोणे सर तसेच लायन्स क्लब चे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे व त्यांचे सहकारी प्रसाद वैद्य, सचिन मुसळे, मर्दा शेठ, निखिल तांबट वगुहागर नगरपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुहागर हायस्कूल विद्यार्थी, NCC विद्यार्थी, लायन्स क्लब, नगरपंचायत व तहसील ऑफिस चे अधिकारी व कर्मचारी वर्ग असे एकूण 250 जणांनी सहभाग घेतला. Labor donation activity under cleanliness service