परिवर्तनासाठी महायुतीच्या राजेश बेंडलांना दिला पाठिंबा
गुहागर, ता. 14 : गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेअंतर्गत असलेल्या 22 मंडळांनी राजेश बेंडल यांच्या विजयासाठी एकत्र येण्याचा ठराव मंजूर केला. गुहागर नगरपंचायतीमध्ये केलेल्या सत्ता परिवर्तनाप्रमाणेच यावेळीही समाज म्हणून महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. Kunbi Samaj Supported to Rajesh Bendal
Kunbi Samaj Supported to Rajesh Bendal
गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेची बैठक बुधवारी (ता. 13) कीर्तनवाडी भागडे विभागाच्या समाजमंदिर झाली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सांगळे यांनी समाज संघटनेच्या विजयी इतिहासाची आठवण सर्वांना करुन दिली. ते म्हणाले की, गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेने गुहागर नगरपंचायतीच्या वेळी आपली ताकद दाखवली होती. माजी पालकमंत्री व तत्कालीन आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या समर्थकांसमोर सक्षम आणि बळकट आव्हान आपण उभे केले. त्यासाठी समाज संघटनेने शहर विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीला केवळ कुणबी समाजानेच नव्हेतर गुहागर शहरवासीयांनी देखील पाठींबा दिला होता. त्यामुळेच गुहागर नगरपंचायतीच्या निवडणूकीत शहर विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. विद्यमान महायुतीचे (Mahayuti) उमेदवार राजेश बेंडल (Rajesh Bendal) यांना नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आणण्यात शहर विकास आघाडी यशस्वी झाली. गुहागर नगरपंचायतीमधील एकूण जागांपैकी 17 जागांपैकी केवळ एका जागेवर जाधव समर्थक नगरसेवक निवडून आला. त्यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्याबद्दल असलेली नाराजी मतदारांनी मतदानातून व्यक्त केली. भास्कर जाधव यांनी नेहमीच समाजाला कमी लेखनाचे काम केले. त्याचे परिणाम त्यावेळी दिसून आले. मात्र निवडणुकीनंतर काही प्रमाणात या शहर विकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुद्धा पहायला मिळाले. आज महायुतीने राजेश बेंडल यांच्या रुपाने कुणबी समाजाला निवडणुकीत उभे केले आहे. राजेश बेंडल हे गुहागर शहरातील आहेत. अशावेळी जुने नाराजीनाट्य विसरुन जावून आपल्या समाज बांधवाला यश मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकत्र आले पाहीजे. असे आवाहन संतोष सांगळे यांनी केले. Kunbi Samaj Supported to Rajesh Bendal
संतोष सांगळे यांच्या आवाहनानंतर जमलेल्या समाज बांधवांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर सखोल चर्चा झाली. या चर्चांच्या अंती गुहागरचा सुपुत्र असलेल्या राजेश बेंडल यांना पाठींबा देण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. गुहागर असगोली परिसरात समाजातील 22 मंडळे आहेत. या मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. Kunbi Samaj Supported to Rajesh Bendal
एकदा समाजाचा निर्णय ठरला की तो कायमचा असतो. हे या समाजाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे यामध्ये कोणीही कितीही जाऊन विचारांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तरी यात बदल होत नाही अनुभव भास्कर जाधव यांना नक्कीच आहे त्यामुळे या पुढील काळात गुहागर शहरांमध्ये कुणबी समाजाच्या मंडळांमध्ये जाऊन इतर कोणत्याही राजकारण्याने हस्तक्षेप करू नये. असा इशारा या संघटनेने दिला आहे.
यावेळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र भागडे, सचिव विकास मालप, नितीन सांगळे, दीपक सांगळे, प्रवीण साटले, दत्ताराम जांगळी, प्रदिप घुमे, प्रविण घुमे, ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुन जांगळी. सदानंद घुमे, अशोक जांगळी, गजानन धावडे यांच्यासह सर्व मंडळातील प्रमुख पदाधिकारी आणि अध्यक्ष उपस्थित होते.