रामदास कदम यांचा डाँ. नातूंना सल्ला, गीतेंना दोनवेळा खासदार मी केले
गुहागर, ता. 29 : मला गुहागर मतदारसंघातून उभे रहायचे नाही मात्र, या मतदारसंघात कोट्यवधींची कामे करण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असे स्पष्ट मत शिवसेना नेते रामदास कदम यांनी हेदवी येथील सभेत व्यक्त केले. तसेच आपण दोघे मिळून आगामी विधानसभेसाठी या मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार देऊ व या समाजाला न्याय देऊ आणि इतिहास घडवू असा सल्ला उपस्थित डाँ. विनय नातू यांना दिला. Kunbi community candidate for Legislative Assembly
गुहागर तालुक्यातील हेदवी हेदवतड येथील प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, माजी आमदार डाँ. विनय नातू, गुहागर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, तालुकाप्रमुख सुनील हळदणकर, मनसे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष बाबू कनगुटकर, आनंद भोजने, संतोष जैतापकर, शशिकांत चव्हाण, राजेश बेंडल, दिनेश बागकर, सचिन ओक आदी उपस्थित होते. Kunbi community candidate for Legislative Assembly
यावेळी रामदास कदम यांनी अनंत गीते यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सुरुवातीला दोनवेळा गीते यांना खासदारकीची उमेदवारी मी मिळवून दिली. तो मुंबईचा पडलेला नगरसेवक होता. त्याला कुणीही विचारत नव्हते, ओळखत नव्हते. बाळासाहेबही ओळखत नव्हते. त्यांच्या दोनवेळच्या निवडणूक उमेदवारीचा खर्च मी केला. त्याला स्वतःचे खेड तालुक्यातील तिसंगी गावही माहित नव्हते. खासदार असूनही स्वतःच्या गावात जाणारा रस्ता करु शकला नाही. त्याच्यात विकास करण्याची धमक नाही. हा तुमचा काय विकास करणार. ज्याला मी उमेदवारी दिली तो माझा होऊ शकला नाही, असे सांगून या निवडणुकीत त्याचे डिपाँझीट जप्त करा, असे आवाहन रामदास कदम यांनी केले. उद्ध्व ठाकरे ५० खोके बोंबलत होते. त्यांनी हे सिद्ध करुन दाखवावे, आम्ही तुमच्याकडे भांडी घासू, अन्यथा तुम्ही आमच्याकडे भांड घासावी असे परखड वक्तव्य कदम यांनी व्यक्त केले. Kunbi community candidate for Legislative Assembly
सर्वधर्मियांना सोबत घेऊन भविष्यात काम करणार आहे असे सुतोवाच सुनिल तटकरे यांनी केले. अंधारातून महाराष्ट्राला प्रकाशात आणण्याचे काम सुनिल तटकरे यांनी केले असे उद्गार माजी मंत्री रामदास कदम यांनी काढले. देशाच्या अस्मितेची ही लढाई असून दहा वर्षात नरेंद्र मोदींनी जे काम केले आहे असे कुठल्याच पंतप्रधानांनी केले नाही असा दावा रामदास कदम यांनी केला. या कोकणात जातपात बघितली जात नाही. कॉंग्रेसचा जातपात नसावी असा अजेंडा होता मात्र त्याची खरी अंमलबजावणी मी आणि सुनिल तटकरे यांनी केली आहे. मुस्लिम मोहल्ल्यात हिंदू आणि हिंदू वस्तीत मुस्लिम बांधव निवडून आणण्याची किमया केली आहे असेही रामदास कदम यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. या जिल्हयात हिंदू – मुस्लीम वातावरण कसे घडेल अशापध्दतीने वातावरण निर्माण केले जात आहे. सावध रहा बांधवांनो. या मतदारसंघात रामदास कदम, सुनिल तटकरे कामाला येणार आहे उध्दव ठाकरे येणार नाही असे आवाहनही रामदास कदम यांनी केले. Kunbi community candidate for Legislative Assembly
यावेळी डाँ. नातू म्हणाले, अनंत गीते सहावेळा निवडून आले. तसेच ५ वर्षे मोदीजींच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे मंत्रीपद होते. त्यांनी गुहागर परिसरात जहाज उद्योग उभारणीच्या नुसत्या घोषणाच केल्या. या अनुभव सर्व कार्यकर्त्यांना आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये गीते सर्व लोकांना हात वर करुन मतदान करण्यासाठी शपथ घ्यायला लावायचे. आता आपले उमेदवार सुनील तटकरे यांची काम करण्याची पध्दत आपल्याला माहित आहे. त्यांना एकदिलाने निवडून देऊन आपणाला त्यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आहे. येथे बसलेले नेते सर्व तालुक्यातील आहेत. प्रत्येक नेता हा जीव ओतून या निवडणुकीत काम करणार आहे. आपण सर्वांनी प्रत्येक मतदारापर्यंत गेलं पाहिजे आणि आपली निशाणी जी घड्याळ आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. हे काम आठ दिवसात आपण पूर्ण करावं आणि सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे यांना बहुमतांनी विजयी करू असा विश्वास डाँ. नातू यांनी व्यक्त केला. Kunbi community candidate for Legislative Assembly
तुमची – माझी श्रध्दा या संविधानावर आहे आणि कायम राहणार आहे मात्र नरेंद्र मोदी संविधान बदलणार असे जाणीवपूर्वक सामाजिक पाप विरोधक करत आहेत असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी हेदवी येथील सभेत केला. देशातील एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण मतदान करणार आहोत. या देशाची अखंडता, एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली असेही सुनिल तटकरे म्हणाले. Kunbi community candidate for Legislative Assembly
देशात आणीबाणीच्या वेळी उद्रेक झाला आणि त्यातून चळवळ उभी राहून इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती सांगताना ही लोकशाही प्रणाली जनतेने त्यावेळी दाखवून दिली. वेगवेगळ्या आघाडयांची सरकारे त्याकाळात अनुभवायला मिळाली. आम्ही भाजपसोबत गेलो मात्र आम्ही आमचा सिध्दांत सोडून दिला नाही. सलग तीन वेळा सरकारे बनली एवढी अस्थिरता देशात निर्माण झाली होती. परंतु नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आणि राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आणि जनतेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन आज दहा वर्षांत झालेला विकास अनुभवत आहोत असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. Kunbi community candidate for Legislative Assembly
४ जूनला ऐतिहासिक निकाल लागेल आणि त्यानंतर संविधानावर आज ओरड करत आहेत त्यांची ओरड नक्कीच थांबलेली दिसेल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. आज देश विकसित होत आहे. अनेक योजना खेड्यापाड्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात लस तयार केली त्या देशाचे नाव भारत आणि त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि यापुढेही राहतील असा ठाम विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. बकासुर, टकमक टोक, बूच अशी वक्तव्ये संसदेत काम केलेले अनंत गीते करतात. ३० वर्षात एखाद्या गावातील साधा रस्ताही अनंत गीते यांनी केला नाही अशी जोरदार टीका करतानाच मी ऊर्जा मंत्री असताना राज्यातील भारनियमन केले आणि जनतेला दिलासा दिला हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. Kunbi community candidate for Legislative Assembly
अनंत गिते तुम्ही ३० वर्षे खासदार होता. पण कुणबी समाजासाठी काय केले ते सांगा. एखाद्या समाजाला निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली नव्हती ती घोषणा अजित पवार यांनी केल्याचे सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. गावावस्तीत जाऊन ही ऐतिहासिक निवडणूक लोकांना सांगण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत जनता साथ देईल आणि राज्यात ४५ +जागा मिळतील असा स्पष्ट दावाही सुनिल तटकरे यांनी केला. Kunbi community candidate for Legislative Assembly