बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेतील यशाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले कौतुक
गुहागर, ता. 25 : एनटीपीसी मौदा येथे आयआरएसएम इंटर टूर्नामेंट अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी विजेते आणि उपविजेते पद पटकावले. या स्पर्धेमध्ये त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक केले. Kudos to the employees of RGPPL
या बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धेमध्ये प्रणय प्रसून, विमल विश्वकर्मा, निशांत ढाका आणि संदीप मित्तल यांनी आरजीपीपीएलचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. यामुळे त्यांना बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विजेते आणि उपविजेते पद प्राप्त झाले. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीने क्रीडा विश्वात एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यामुळे रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक करून त्यांच्या उत्कृष्ट खेळातील कामगिरीमुळे त्यांचा कंपनीच्या कार्यालय मध्ये गौरव केला व पुढील होणाऱ्या विविध स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Kudos to the employees of RGPPL