गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.डि. गिरी यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti at Aabloli
यावेळी इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आपली मनोगते व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.श्वेता कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी पद्मश्री वैद्य हिने केले. श्री. एन. पी.जगताप सर यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या आदर्श तत्वांचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री.डि.डी. गिरी यांनी व्यक्त केले. Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti at Aabloli