रत्नागिरी, ता. 07 : यंदाच्या वर्षी जून महिन्याऐवजी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. मान्सूनचे आगमन लवकर झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या सार्यात कोकण रेल्वे मात्र निवांत दिसत असून, यामागचं मुख्य कारण ठरत आहे ते म्हणजे बहुतांशी प्रमाणात या मार्गावर पूर्णत्वास गेलेली पावसाआधीची काही तांत्रिक आणि दुरूस्तीची कामं. याच प्रगतीमुळं यंदाच्या वर्षी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतला असून, पावसाळी वेळापत्रकातून 15 दिवस वगळून नव्यानं या वेळापत्रकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब. 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. Konkan Railway will slow down


पावसाच्या दिवसांमध्ये सहसा वळणवाटांतून जाणार्या कोकण रेल्वेमार्गावर अनेक आव्हानं येतात. रेल्वेमार्गावर येणार्या धुक्यामुळं दृश्यमानता कमी होते. त्यातच काही रेल्वे मार्गांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. तत्सम घटनांमुळं रेल्वेगाड्या खोळंबतात आणि अशा वेळी रेल्वे अपघाताचा धोकाही बळावतो. या कारणास्तव सावधगिरी म्हणून दरडप्रवण क्षेत्रातील संभाव्य दरडी कोकण रेल्वेनं काढण्याची कामं केली आहेत. शिवाय दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. तरीही परिस्थिती बिघडू नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर 636 कर्मचारी 24 तासांच्या गस्तीवर ठेवण्यात येणार आहेत. Konkan Railway will slow down