• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

15 जूनपासून कोकण रेल्वेचा वेग मंदावणार

by Guhagar News
June 7, 2025
in Ratnagiri
213 2
0
Konkan Railway will slow down
419
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 07 : यंदाच्या वर्षी जून महिन्याऐवजी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. मान्सूनचे आगमन लवकर झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या सार्‍यात कोकण रेल्वे मात्र निवांत दिसत असून, यामागचं मुख्य कारण ठरत आहे ते म्हणजे बहुतांशी प्रमाणात या मार्गावर पूर्णत्वास गेलेली पावसाआधीची काही तांत्रिक आणि दुरूस्तीची कामं. याच प्रगतीमुळं यंदाच्या वर्षी कोकण रेल्वेनं मोठा निर्णय घेतला असून, पावसाळी वेळापत्रकातून 15 दिवस वगळून नव्यानं या वेळापत्रकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बाब. 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. Konkan Railway will slow down

पावसाच्या दिवसांमध्ये सहसा वळणवाटांतून जाणार्‍या कोकण रेल्वेमार्गावर अनेक आव्हानं येतात. रेल्वेमार्गावर येणार्‍या धुक्यामुळं दृश्यमानता कमी होते. त्यातच काही रेल्वे मार्गांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. तत्सम घटनांमुळं रेल्वेगाड्या खोळंबतात आणि अशा वेळी रेल्वे अपघाताचा धोकाही बळावतो. या कारणास्तव सावधगिरी म्हणून दरडप्रवण क्षेत्रातील संभाव्य दरडी कोकण रेल्वेनं काढण्याची कामं केली आहेत. शिवाय दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. तरीही परिस्थिती बिघडू नये यासाठी कोकण रेल्वे मार्गावर 636 कर्मचारी 24 तासांच्या गस्तीवर ठेवण्यात येणार आहेत. Konkan Railway will slow down

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkan Railway will slow downLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share168SendTweet105
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.