भारतीय तटरक्षक दलाची सभा, मच्छिमारांच्या प्रतिनिधींनी अनुभवली खोल समुद्रातील थरारक प्रात्यक्षिके
गुहागर, ता. 04 : भारतीय तटरक्षक दलाची नॅशनल मारिन सर्च अँड रेस्क्यू बोर्डची जनरल सभा दि. 28 व 29 नोव्हेंबर रोजी क्राऊन प्लाझा, कोचीन, केरळ येथे झाली. या सभेला महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली कोकणातील मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी कोकणातील कोळ्यांचा पारंपरिक पोशाख परिधान करुन तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसह कोचीवासियांची मने जिंकली. Konkan Koli costume won hearts in Kochi
या सभेत मच्छीमार संघटनांच्या समस्या, अडचणी, बचाव कार्यासाठी नवीन संशोधन यावर देशभरातून किनारी भागातून आलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तट रक्षक दलाच्या मोठ्या दोन जहाजांमधून सहभागी मच्छिमार प्रतिनिधींना खोल समुद्रात नेण्यात आले. यावेळी बोटीला आग लागणे, बोट बुडणे व विमान इंजिन बिघडल्यामुळे पाण्यात उतरविल्यास तटरक्षक दलाकडून कसे बचाव कार्य केले जाते, याचे थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. Konkan Koli costume won hearts in Kochi
यामध्ये तटरक्षक दलाच्या जवळपास 10-12 लहान-मोठी जहाजे, कस्टम, नेव्ही व सागरी पोलीस दलाच्या बोटी, छोट्या लाईफ गार्ड व रिमोटने ऑपरेट करीत असलेले लाईफ गार्ड च्या बोटी आणि 4-5 हेलिकॉप्टरच्या कसरती पहावयास मिळाल्या. या सभेस शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडिंयन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, नॅशनल हायड्रोग्राफिक कार्यालय, इयरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया, इसरो हेड क्वार्टर्स, सेंट्रल बोर्ड ऑफ कस्टम अँड एक्साईज, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, मेजर पोर्ट्स, शिपिंग इंडस्ट्री, पोर्ट मॅनेजमेंट बोर्ड, मेरी टाइम बोर्ड – आंध्र प्रदेश, काकींनाडा, युटी दमण, गोवा, गुजरात,केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिसा, तामिळनाडू तसेच सेलिंग वेसल ऑपरेटर्स, सिव्हिल इव्हिएशन, ब्युरो ऑफ ईमिग्रेशन,मिनिस्ट्री ऑफ शिपिंग, इनकॉईश, डिपार्टमेंट ऑफ फिशरीज, सी आय एस एफ, बी एस एफ, एन डी एम ए, आणि फिशरीज गोवा, फिशरीज केरळचे अधिकारी उपस्थित होते. Konkan Koli costume won hearts in Kochi
यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी कोकणातील कोळ्यांचा पारंपरिक पोशाख कोळी रुमाल, टी शर्ट, जॅकेट व कोळी टोपी घालून नृत्य सादर केले. या कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मच्छिमार प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल व सेक्रेटरी जॅक्सन पय्रोल यांना भाग घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी तटरक्षक दलाचे आभार मानले. Konkan Koli costume won hearts in Kochi